घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

By Shubham Pawar

Published on:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत.

विपरित परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

या महामानवाची १३० वी जयंती जग भरात दि.१४ एप्रिल २०२१ रोजी साजरी होत आहे. या जयंती निमित्त राज्यातील अनुसुचित जाती,

जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी विशेष मोहिम दि.१४ एप्रिल २०२१ ते दि.६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana

उद्दिष्ट : दि.१४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने

महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठयासंबधी असणा-या तक्रारी/ समस्यांचे निवारण करण्याबाबतही समावेश असेल.

Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

लाभार्थ्यांची अनुज्ञेयता : या योजनेतील घरगुती वीज जोडणीकरणा-या लाभार्थ्यांची अनुज्ञेयता खालीलप्रमाणे राहील :

 • लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याचा जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • महावितरण कंपनीस वीज जोडणीकरीता करण्यात येणा-या विहित नमुन्यानुसार अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला इत्यादी असणे आवश्यक असेल.
 • अर्जदारानी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.

जीवन प्रकाश योजना योजनेची कार्यपध्दती

 1. Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana लाभार्थी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करील.
 2. अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
 3. लाभार्थ्याने रू.५००/- इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील.
 4. सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्येच भरण्याची सुविधा असेल.
 5. अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या या संदर्भातील अस्तित्वात असणा-या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
 6. महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही
 7. अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
 8. तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे
 9. स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपयोजना सहीत) अथवा
 10. इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधी मधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

 1. याशिवाय अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटीत उद्योगामधील वीज समस्यांचे प्राधान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हा स्तरावर अधीक्षक अभियंता अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्राकरीता कृती दलाची स्थापना करण्यात येईल.
 2. अशा कृती दलात त्या कार्यक्षेत्रातील अनुसुचित जाती/ अनुसुचित जमातीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उद्योजकांचा समावेश असावा. मुख्य अभियंता स्तरावर याचा दर महिन्यांनी आढावा घेण्यात येईल.
 3. तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर समर्पित वेब पोर्टल निर्माण करण्यात येईल.
 4. या योजनेची महावितरणद्वारा प्रसिध्दी करण्यात येईल. ‘Dr Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana’
 5. संनियत्रण व आढावा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरणद्वारा आवश्यकतेनुसा परंतु किमान त्रैमासिकरित्या घेण्यात येईल यातून झालेली फलनिष्पत्तीचा अहवाल शासनास दर महिन्यास सादर करेल.
 6. या योजनेसाठी लागणारा निधी महावितरण स्वनिधी/ जिल्हा विकास समितीचा निधी(विशेष घटक योजना तथा आदिवासी उपयोजना सहीत)/कृषी आकस्मिकता निधी मधुन करता येईल.
 7. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर याबाबत यशस्वी गाथा व त्रुटी आढळल्यास त्याचा फलनिष्पती अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

 

 • GR शासन निर्णय - Download

 

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

2 thoughts on “घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना”

Leave a Comment