शिष्यवृत्ती : कीप इंडिया स्माईलिंग फाउंडेशनल स्कॉलरशिप प्रोग्राम 2024
विस्तृत माहिती:
कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड तरुण विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप देऊन त्यांच्या शैक्षणिक / करिअरच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी देत आहे. हा स्कॉलरशिप कार्यक्रम त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या करिअर कडे वाटचाल करण्यासाठी विविध पदव्युत्तर आणि पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो.
पात्रता/ निकष:
2021 च्या बोर्ड परीक्षेत किमान 75% गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा 12 वी मध्ये कमीतकमी 60% गुणांसह उत्तीर्ण झालेले विध्यार्थी त्यांचे अनुक्रमे उच्च माध्यमिक, 3-वर्षाचे पदवी, 4-वर्षाचे अभियांत्रिकी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम असे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सर्व अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न वर्षाकाठी 5 लाखाहून कमी असणे आवश्यक आहे.
पुरस्कार आणि पारितोषिके:
निवडझालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या 4 वर्षां साठी रुपये 30,000 वार्षिक भत्ता लाभ मिळतील.
शेवटची तारीख: 31-01-2022
अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/mhcr/KISF1