बीज भांडवल कर्ज योजना महाराष्ट्र | Beej Bhandwal Yojana in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Beej Bhandwal Karj Yojana Maharashtra: राज्य शासनाची बीज भांडवल योजना (एसएमएस) केंद्र शासनाच्या व बँकाच्या विविध योजनांचा परिपूर्ण लाभ घेणाऱ्या बेरोजगारापैकी उर्वरीत बेरोजगारासाठी लघु उद्योग, सेवा उद्योग इतर विविध प्रकारच्या व्यवसायामधून स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत उद्योग संचालनालयाचे अधिपत्याखालील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वसंतराव नाईक यांनी 5 लाखांपर्यंतच्या राष्ट्रीय मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कर्जाद्वारे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास कारपोरेशनसाठी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या अनुदानाद्वारे विशेष बीज योजना सुरू केली आहे.

ही योजना राष्ट्रीय मागासवर्गीय विकास महामंडळ आणि जिल्ह्यात आहे. वसंतराव नाईक हे विमुक्त जाती आणि नोमड जनजागृती निगम यांनी राबविले आहेत.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नती करणे.

Beej Bhandwal Karj योजनेच्या प्रमुख अटी:

 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
 2. अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलच असावा.
 3. अर्जदाराचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.
 4. अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये.
 5. राज्य महामंडळाच्या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000/- व केंद्रीय
 6. महामंडळाच्या योजनांकरीता शहरी भागाकरीता रु. 1,20,000/- व ग्रामीण भागाकरीता रु. 98,000/- पर्यंत असावे.
 7. या योजनेअंतर्गत एकाच शासकीय उपक्रमांकडून लाभधारकाला कर्ज / अनुदान घेता येणार नाही.
 8. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
 9. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच कर्ज मिळेल. \’Beej Bhandwal Yojana in Marathi\’

Beej Bhandwal Karj Yojana पात्रता व वैशिष्ट्ये

पात्रता:-

 • कमीत कमी ७ वी पास व वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे
 • अर्जदार महाराष्ट्राचा किमान १५ वर्षाचा रहिवासी असावा.
 • शिक्षणाची अट कुशल कारागीरांसाठी पात्रतेनुसार शिथिल करण्यात येते. \”Beej Bhandwal Yojana\”

वैशिष्टये:-

 • प्रकल्प मर्यादा रु. २५.०० लाखा पर्यंत आहे.
 • बीज भांडवल कर्जाची कमाल मर्यादा रू. ३.७५ लाख पर्यंत आहे.
 • बँक कर्ज ७५ टक्के.
 • रूपये दहा लाखा पेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांमध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण पुढीलप्रमाणे राहील.
 • सर्व साधारण प्रवर्गातील लाभधारकांसाठी:- 15 टक्के
 • अनु.जाती/ जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती / जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना:- 20 टक्के

 

बीजभांडवल आकारावयाचे व्याज

 • बिज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज (सॉफ्ट लोन) म्हणून दरसाल ६% व्याजाने देण्यात यावे.
 • बीज भांडवल कर्जाच्या रक्कमेची विहीत कालावधीत परतफेड करण्यात आली नाही तर थकीत रक्कमेवर द.सा.द.शे १ टक्के दंडनीय व्याज आकारण्यात येईल.
 • बीज भांडवल कर्जाच्या रकमेची नियमितपणे विहीत कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थीना ३ टक्के रिबेट देण्यात येते.
 • शासन निर्णय १५ सप्टेंबर, २००३ अनुसार कर्जदाराने थकीत मुद्दल व व्याज एकरकमी भरणा केल्यास त्यास दंडनीय व्याज माफ आहे.
 • अशा प्रकरणांमध्ये द.सा.द.शे. १% दराने दंडव्याज आकारण्यात येणार आहे व वरील व्याज पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक ०१.१०.१९९३ पासूनच्या सर्व चालू प्रकरणांना लागू आहे.
 • सदर योजना वाहन व्यवसाय, व्यापार व उद्योगसाठी लागू आहे.
 • कर्जाची परतफेड ७ वर्षाच्या आत करावयाची असुन सुरवातीचा ३ वर्षे विलंबावधी (वाहनांसाठी ६ महिने) निश्चित करण्यात येईल. Beej Bhandwal Yojana Maharashtra

 

बीज भांडवल कर्ज योजना कागदपत्रे

 • महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला.
 • योजनेसंबंधीची सविस्तर माहिती दरपत्रक, कच्चा माल कसा तयार होणार, तयार माल कसा विकणार इत्यादी तपशिल (प्रकल्प अहवाल)
 • अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास, प्रमाणपत्राची प्रत.
 • अर्जदार ज्या जागेत व्यवसाय करणार आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा. Beej Bhandwal Yojana
 • अर्जदारास व्यवसायाचा पुर्वानुभव असल्यास त्याबद्दल पुरावा.
 • शिधा वाटप पत्र (रेशन कार्ड) आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत बंधनकारक आहे.
 • ऑटोरिक्षा करीता अर्ज करावयाचा असल्यास वाहन परवाना, प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आर.टी.ओ.) परवाना.
 • ऑटोरिक्षा करीता नंबर लावल्याचा पुरावा व रिक्षा बुकिंगबद्दल विक्रेत्याकडील दरपत्रक.
 • दोन पात्र शासकीय जामिनदारांची पात्रता सिध्द करणारी कागदपत्रे, उदा. जमिनीचा सात बारा उतारा (ग्रामीण भागाकरीता), वेतन पत्रक, कार्यालयीन ओळखपत्र

 

Beej Bhandwal Yojana Maharashtra

लाभाचे स्वरुप:-

 • 25 टक्के बीजभांडवल योजना
 • प्रकल्प मर्यादा रु. 5,00,000/-
 • परतफेड कालावधी 5 वर्षे
 • 25,000/- थेट कर्ज योजना
 • प्रकल्प मर्यादा रु. 25,000/-
 • परतफेड कालावधी 4 वर्षे

महत्वाचे:-

कर्ज अर्ज सादर करतांना दस्तऐवजांची सत्यप्रत पडताळणीकरीता सोबत ठेवावेत.

संपर्क कार्यालयाचे नाव:-

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

नोट:- वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी. Beej Bhandwal Yojana 2024 Maharashtra

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “बीज भांडवल कर्ज योजना महाराष्ट्र | Beej Bhandwal Yojana in Marathi”

Leave a comment