Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ आहे. सर्वसाधारण साधारण शिष्यवृत्ती योजना या शिष्यवृत्तीचा लाभ कामगार कुटूंबियांना मिळावा त्याकरिता चार प्रकारात शिष्यवृत्ती योजना विभागण्यात आली आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता नवीन उत्तीर्णपासून ते पुढील प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण शिष्यवृत्ती नववी उत्तीर्ण ते पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच कामगार कुटूंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेकिरता गुणानुक्रम अथवा टक्केवारीची अट नाही. परदेशी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या कामगारांच्या पाल्यांना ५० हजारापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. \’Bandhkam Kamgar Scholarship\’
तसेच MPSC, UPSC या स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षेचा टप्पा उत्तीर्ण करणाऱ्या कामगार कुटुंबातील पाल्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. क्रीडा शिष्यवृत्ती योजनांतर्गत कामगार कुटूंबियांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. या सर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा मुंबई कामगार कल्याण निधी कायदा अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे कामगार कुटूंबातील असणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती योजना नियम व अटी
- सदर शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (Maharashtra Labour welfare Fund) भरणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी आहे.
- अर्ज भरताना कामगाराचा मंडळाने दिलेला LIN नंबर आवश्यक आहे.
- सदर योजना किमान ९ वी पास झाल्यानंतर अर्थात १० पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी आहे. Bandhkam Kamgar Scholarship
- मागील परीक्षेत किमान ६०% गुण असणे गरजेचे. (विद्यार्थ्यास चालू शैक्षणिक वर्षात ज्या किमान शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्रवेश मिळाला असेल त्या अभ्यासक्रम इयत्तेचे किमान ६०% गुण ग्राह्य आहेत)
- शिष्यवृत्ती केवळ शासनमान्य अभ्यासक्रमासाठी आहे. शासनमान्य नसलेल्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू नये.
- मुक्त विद्यापीठ, बहिस्थ: विद्यापीठ / दूरस्थ शिक्षण घेणारे / अप्रैटीसशिप – इंटर्नशिप व मानधन, मोबदला, Stipend घेणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जासोबत जोडवयाची सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात स्कॅन (Scan Original Documents) केलेली असावीत. झेरॉक्स स्कॅन करून अर्जासोबत अपलोड केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
- शिष्यवृत्ती अर्ज भरताना एकूण गुण, प्राप्त गुण व प्राप्त गुणांची टक्केवारी इत्यादी तपशील स्पष्ट नमूद करावा. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड / पॉईट किंवा इतर पध्दतीने गुण प्राप्त असतील त्यांनी मिळालेल्या गुणांची टक्केवारी संबंधित महाविद्यालयातुन पत्राद्वारे प्राप्त करावी व ते पत्र देखील अर्जासोबत अपलोड करावे.
- कामगारांच्या दिव्यांग पाल्यांना शासनाच्या धोरणानुसार एकूण शिष्यवृत्ती रक्कमेच्या ३% प्रमाणात सरसकट शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. दिव्यांगासाठी ६०% गुणांची अट तसेच पालकांच्या उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मंजुरीपत्रक विभाग निर्गमित करेल. शासन नियमानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतूद आणि कामगार पालकांचा उत्पन्न गट, विद्यार्थ्याची परीक्षेतील टक्केवारी या निकषावर उत्पन्न गटातील गुणानुक्रमे / मेरीट नुसार दिली जाते.
- सादर करीत असलेली सर्व माहिती व कागदपत्र खरी आहेत तसेच मंडळाच्या सर्व नियम व अटी आम्हाला मान्य आहेत. \’Bandhkam Kamgar Scholarship Yojana\’
आवश्यक कागदपत्रे Bandhkam Kamgar Scholarship Documents
- कामगारांचा LIN नंबर
- कामगारांच्या वेतनातून MLWF कपात केल्याची नोंद
असलेला चालू वर्षातील जून चा वेतन दाखला (Salary slip)
कामगारांचा फॉर्म १६ कि आस्थापनेणे दिलेला उत्पन्न दाखला - विद्यार्थ्यांची मागील वर्षाची गुणपत्रिका, ग्रेड / पॉईंट असल्यास टक्केवारीत रूपांतर केलेले महाविद्यालयाचे पत्र चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
- शैक्षणिक खंड असल्यास तहसीलदार प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास शासन नियमानुसार प्रमाणपत्र
पालक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा कॅन्सल्ड चेक किंवा विद्यार्थ्याच्या बँक खात्याच्या पासबुकचे सर्व तपशील असलेले पृष्ठ इत्यादी सर्व संबंधित कागदपत्रे
नोट: अपूर्ण माहिती दिलेले व कागदपत्रांची पूर्तता नसलेले अर्ज ऑनलाईन सादर करू नयेत. अर्ज मंडळाने दिलेल्या विहित नमुन्यात व योग्य मूळ कागदपत्रांसह विहित कालावधीत तसेच सुस्पष्ट कागदपत्रांसह सादर करावेत. अन्यथा अर्ज बाद होईल. याची सर्व जबाबदारी विद्यार्थी व पालकांची असेल. Kamgar Yojana Scholarship
सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना स्वरूप
- महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे कामगार पाल्य सदर योजनेसाठी पात्र आहेत.
- इयत्ता नववी पास झाल्यानंतर इयत्ता दहावी पासून पुढील सर्व शिक्षणासाठी सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.
- विद्यार्थ्यास मागील शैक्षणिक वर्षात किमान ६० टक्के गुण असावेत.
- इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, इतर शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम, पीएचडीसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी, तसेच यूपीएससी व एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
- दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करताना टक्केवारी व पालकांच्या उत्पन्न मर्यादेत बंधन नाही.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Online Registration 2024
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला असल्यास विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सह अर्ज करता येईल.
- प्राप्त अर्ज गुणवत्तेनुसार (मेरिट) व मंडळाच्या आर्थिक तरतुदीच्या अधिन राहून मंजूर / नामंजूर केले जातील.
- मुक्त विद्यापीठाचे बहिस्थ व दूरस्थ शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच अप्रेंटिसशिप इंटर्नशिप किंवा शिक्षण घेताना मानधन, मोबदला,मेहनताना घेणारे विद्यार्थी सदर योजनेसाठी अपात्र असतील.
- मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
- जून मध्ये साखर कारखाने बंद असतात. अशावेळी हंगामी कामगारांची मागील डिसेंबर ची पावती ग्राह्य असेल.त्यात महाराष्ट्र कामगार कल्याण निधी रु.१२/- कपात नोंद असावी. Bandhkam Kamgar Scholarship Form PDF
ऑफलाईन अर्ज नमुना pdf – DOWNLOAD HERE
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Sc category