अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाढीव मदत, राज्य सरकारचा निर्णय | Ativrushti Nuksan Bharpai 2021

Ativrushti Nuksan Bharpai 2021: पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 प्रमाणे वाढीव मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. मित्रांनो या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात मागील (जुलै) महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर आदी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

मात्र, एनडीआरएफच्या निकषांनुसार कोणतेही वाढीव मदत न करता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती. अखेर सरकारने याची दखल घेत वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला. Ativrushti Nuksan Bharpai maharashtra

Ativrushti Nuksan Bharpai 2021

जुलै महिन्यात राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांत अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषात बदल करुन नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे सातत्याने मागणी केली आहे.

मात्र, केंद्र सरकारने २०१५ नंतर नुकसान भरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. याच निकषानुसार, ठाकरे सरकारने नुकसान झालेल्या बागायती पीकांना एकरी ५४०० रुपये तर खरीप पिकांना एकरी २७२० रुपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर केली होती.

Compensation for Heavy Rains 2019 in Maharashtra

  •  Ativrushti Nuksan Bharpai दुसरीकडे, २०१९ मध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात अशीच अतिवृष्टी झाल्यानंतर महापूर आला होता.
  • त्यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारने बागायती पीकांना एकरी ३८ हजार रुपये तर खरीप पीकांना १८ हजार रुपये दिले होते.
  • सोबतच भाजप सरकारने तातडीने ग्रामीण भागात १० हजार तर शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह दिले होते.
  • मात्र, ठाकरे सरकारने सरसकट १० हजार सानुग्रह देण्याचा निर्णय जाहीर केला.
  • अद्याप अनेक शेतकऱ्यांना तातडीच सानुग्रह अनुदानही मिळालेले नाही. मदतीत हात आखाडता घेतला असतानाच सानुग्रह मिळाले नसल्याचे चित्र आहे.

ठाकरे सरकार विरोधात काढला होता मोर्चा

  •  “Ativrushti Nuksan Bharpai” राजू शेट्टींनी ठाकरे सरकारविरोधात काढला होता मोर्चा राज्य सरकारने ११ ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन आदेशात १३ मे २०१५ प्रमाणे मदत देण्याची घोषणा केली होती.
  • २०१५ च्या शासन निर्णयात बागायती पीकांना एकरी ५४०० रुपये तर खरीप पीकांना २७२० रुपये भरपाई देण्याचा आदेश काढला होता.
  • त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झालेले असताना सरकारकडून पाच-दहा हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्तांत उमटली होती.
  • या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला लक्ष्य केले होते. ‘Ativrushti Nuksan Bharpai’
  • सोबतच पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली असल्याचा आरोप करत शेट्टींनी कोल्हापूर आणि इस्लामपूर या येथे आक्रोश मोर्चा काढला. शेट्टी सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2021

तरीही या मोर्चात शेट्टींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.

अखेर ठाकरे सरकारने २०१९ मधील महापूरात फडणवीस सरकारने दिलेल्या वाढीव मदतीप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला.

 

Leave a Comment