Reliance Foundation Scholarship 2022: मित्रांनो, रिलायन्स फाऊंडेशन तर्फे दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) दिली जाते. ज्यामध्ये 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्णसंधी असते.
आता यावर्षी सुद्धा ही रिलायन्स फाऊंडेशन तर्फे Reliance Foundation Scholarship 2022 दिली जाणार आहे. तर यासाठी कोण पात्र असतील? अर्ज कसा करावा? अंतिम मुदत काय आहे? सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
Reliance Foundation Scholarship 2022
मित्रांनो, रिलायन्स फाऊंडेशन दरवर्षी 5,000 पर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्तेसह निकषांवर आधारित शिष्यवृत्ती {Reliance Foundation Scholarship 2022} देत असते. रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिप्सचे उद्दिष्ट गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक ओझ्याशिवाय त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी सक्षम बनवणे आहे.
15 लाख रु. पेक्षा कमी घरगुती उत्पन्न असलेले विद्यार्थी, ज्यांनी त्यांच्या पदवीपूर्व अभ्यासाच्या पहिल्या वर्षात कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला असेल, ते रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) करिता अर्ज करू शकतात. मुली आणि विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचाही या कार्यक्रमाचा उद्देश असेल.
रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी कार्यक्रमाच्या कालावधीत 2 लाखांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळेल. शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त, रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा भाग बनण्याची संधी मिळेल आणि त्यांना सक्षम सपोर्ट सिस्टम प्रदान करेल ज्यामुळे त्यांच्या जीवनावर आणि करिअरच्या मार्गावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण होईल.
🧑🎓निकॉन स्कॉलरशिप 2023, 1 लाख रुपये शिष्यवृत्ती 👉येथे क्लिक करून पहा
आता रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीची (Reliance Foundation Scholarship 2022) वैशिष्ट्ये काय आहेत? ते पाहुयात.
Reliance Foundation Scholarship 2022 Features
- पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल
- त्यांच्या आवडीच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास करणार्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल
- गुणवंत विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारावर पुरस्कृत केले जाते
- 5,000 पर्यंत विद्यार्थी निवडले जातील
- पदवी शिक्षणाच्या कालावधीत उपलब्ध शिष्यवृत्तीची एकूण रक्कम 2 लाखांपर्यंत असेल
- शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य देईलच, विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कद्वारे आपोआप नेटवर्किंगच्या संधी मिळतील
Reliance Foundation Scholarship 2022 Eligibility Criteria
- किमान 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षात पूर्णवेळ प्रवेश घेतलेले विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) करिता पात्र ठरतील.
- त्याशिवाय विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.
- विद्यार्थ्यांचे घरगुती वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. त्यापैकी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
Reliance Foundation Scholarship 2022 Application and Selection Process
मित्रांनो, रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 फेब्रुवारी 2023 पर्यन्त आहे.
🛑 रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती (Reliance Foundation Scholarship 2022) करिता अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लिक करा
📽️ रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती अर्ज कसा करावा? जाणून घेण्यासाठी 👉 विडिओ पहा
रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी पर्यन्त आहे?
रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 फेब्रुवारी 2023 पर्यन्त आहे.
रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती करिता पात्रता कोणती?
किमान 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षात पूर्णवेळ प्रवेश घेतलेले विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती करिता पात्र ठरतील.