MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) ही महाराष्ट्र, भारतातील राज्य-मालकीची बस सेवा ऑपरेटर आहे. प्रवाशांच्या फायद्यासाठी ते अनेकदा विविध प्रवास योजना आणि उपक्रम सादर करतात.
MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2024
महाराष्ट्र सरकार विविध योजना काढत असते. म्हणून खास प्रवासासाठी प्रवाशांना प्रवासासाठी सुद्धा ‘आवडेल तेथे प्रवास’ अश्या नावाची योजना काढली आहे. ह्या योजनेची स्थापना सन 1988 पासून स्थापित केली गेली आहे. प्रवाशांसोबत स्नेह , मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे कमी खर्चात विविध ठिकाणी जसे पर्यटन स्थळे , धार्मिक स्थळे फिरता यावी या हेतू खाली त्यांनी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास हि योजना प्रस्थापित केली.
या योजनेमध्ये सात दिवसाच्या पासप्रमाणे चार दिवसाचा पास हा दिला जातो. खाजगी ट्रॅव्हलिंग कंपनी त्यांच्या सोयी सुविधा अश्या विविध ट्रॅव्हलिंग त्यांच्यासोबत स्पर्धा असताना सुद्धा प्रवाशांनी आवडेल तेथे प्रवास ह्या योजनेला उत्तमरीत्या प्रतिसाद दिला MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2024
आवडेल तेथे प्रवास ह्या योजनेची प्रक्रिया हि कशी असेल ह्यावर चर्चा करू
आवडेल तेथे प्रवास ह्या योजनेच्या अंतर्गत चार दिवसांच्या पाससाठी वर्षातून 2 फेरी म्हणजेच 2 हंगाम करण्यात आले. ह्या मध्ये 15 ऑक्टोबर ते 14 जून हा गर्दीचा हंगाम असेल असं सूचित केले गेले आहे तर 15 जून ते 14 ऑक्टोबर हा कमी गर्दीचा असेल. ह्या कारणाने ह्या दोन्ही हंगाम मधील किंमती मध्ये पण तफावत असेल असे एसटी महामंडळाने सूचित करण्यात आले.
एसटी ची योजना
या योजनेमध्ये प्रवाशांचा पास हा चार दिवसांचा काढला जातो. ज्या सरकारी महामंडळाच्या गाडया आहेत जसे शिवनेरी , शिवशाही , हिरकणी , एसटी लाल डब्बा इत्यादी अश्या बस ची निवड ह्या प्रवासासाठी प्रवाशांची निवड केली जाते. अश्या प्रकारे पास ची किंमत एका प्रवाशी माघे महाराष्ट्रात चार दिवस कोठेही आणि कितीही फिरता येते , प्रवास करता येतो. चार दिवसांच्या साध्या लाल एसटी पास ची किंमत प्रतिव्यक्ती 965, निमआरामसाठी 1150 तर शिवशाहीसाठी 1205 रुपये शुल्क असून ,प्रवाशी चार दिवसांच्या पासला जास्त प्राधान्य देत अशी महामंडळाला माहिती मिळाली आहे. MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana
धार्मिक स्थळे जसे तुळजापूर , अक्कलकोट ,गणपतीमुळे , जेजुरी इत्यादी स्थळांना ह्या पास चा लाभ घेताना प्रवाशी दिसून येतात .त्याचप्रमाणे लग्न सराई असेल लागोपाठ लग्न असतील त्या प्रसंगी सुद्धा ह्या पास चा फायदा मोठ्या प्रमाणावर प्रवाशी घेतात.
त्याचप्रमाणे नैसर्गिक स्थळ जसे महाबळेश्वर , कोकण इत्यादी ठिकाणी सुद्धा प्रवाशी मोठ्या प्रमाणावर आनंद घेताना दिसून येतात .अश्या प्रकारे विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटी भाडे हे खूप असते आणि हे भाडे प्रवाशांना परवडत नाही असा प्रतिसाद प्रवाश्यानी एसटी महामंडळाला दिला म्हणूनच एकाच वेळी विविध ठिकाणी चार दिवसासाठी 965 रुपये खर्च करून महाराष्ट्रात कोठेही फिरणं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आवडत आहे.
आवडेल तेथे प्रवास
ह्या पास ची वैधता कधीपासून असेल ?
या योजने अंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल. ह्या चार दिवसाच्या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून ते चौथ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असेल असे सूचित करण्यात आले. ह्यामध्ये जर प्रवाशांना आंतरराज्यात प्रवास करायचा असेल किंवा महाराष्ट्रात प्रवास करायचा असेल ह्याची वैधता हि सारखीच असेल. ज्या प्रवाशांना हा पास बनवायचा असेल त्यांना जवळच्या बसस्थानकात ओळखपत्र बनवून पास बनवता येईल असे सांगितले गेले.
पासधारकांसाठी नियमावली
- ज्या प्रवाशाकडे हा पास असेल आणि तो प्रवास करत असेल तर अश्या पासधारकांसाठी ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश त्यांचा नाकारू नये.
- ह्या योजने अंतर्ग्रत जे पास धारक आहेत ते आवडती हवी ती सीट / आसन साठी हक्क सांगत असेल तर तो प्रवाशी ह्या पासचा गैरवापर करत आहे असे दिसून येईल.
- पास हरविल्यावर त्याच्या ऐवजी दुसरा पास हा दिला जाणार नाही, तुमच्या पास ची जबाबदारी हि तुमची राहील, ह्याची नोंद घ्यावी.
- पास चा गैरवापर कोण करत असेल तर त्या प्रवाश्याचा पास हा जप्त केला जाईल.
- प्रवास करताना पासधारकाची कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली तर त्यासाठी एसटी महामंडळ जबाबदार राहणार नाही.
- आवडेल तेथे प्रवास ह्या योजनेअंतर्गत जर पासधारकाच्या पास ची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक पुढे प्रवास करत असेल तर त्याच्याकडून तिकीट आकारलं जाईल. MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana
- सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
- प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.
- आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
- काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये.
- संप / काम बंद आंदोलन यामुळे रा.प. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
- स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.