ही लक्षणे जाणून घ्या आणि लम्पीचा धोका टाळा | Lampi Virus in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Lampi Virus in Marathi – लंपी स्कीन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lampi Virus in Marathi

या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु, देवी विषाणू गटातील कॅप्री पॉक्स या प्रवर्गात मोडतात; या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. देशात ह्या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेमार्फत केले जाते.

वैशिष्ट्ये

 1.  गाई व म्हशी मधील सर्व वयाच्या जनावरांना हा आजार होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना त्याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. \”Lampi Virus in Marathi\”
 2. या आजाराची लागण होण्याचे प्रमाण एकूण पशुधन संख्येच्या (गो व महिष वर्गीय) साधारणतः 10 ते 20 टक्के असून मृत्युदर 1 ते 5 टक्के इतका असतो. या विषाणूचे शेळ्या- मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले, तरी हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही.
 3. देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना ह्या आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
 4. जनावरांपासून मानवास हा आजार होत नाही. {Lampi Virus in Marathi}
 5. साधारणतः 4 ते 14 दिवस या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवडे हा विषाणु रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते.
 6. जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील खाव, लाळ, इत्यादी मधून हा विषाणु बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराची लागण होते; त्वचेवरील खपल्यामध्ये हा विषाणु अंदाजे 18 ते 35 दिवस जिवंत राहू शकतो.
 7. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग या द्वारेही याची लागण होऊ शकते.

आजाराचा प्रसार

सदर रोगाचा प्रसार खालील मार्गाने होतो.

 1.  बाह्य कीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.).
 2. बाधित जनावरांच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्त्राव, दूध, लाळ, विर्य, इ. माध्यमा मार्फत.
 3. संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे होऊ शकतो त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. {Lampi Virus in Marathi}

रोग लक्षणे

 1. या रोगामध्ये मध्यम स्वरुपाचा ताप 2 ते 3 दिवस राहतो. परंतू काही वेळेस 105 ते 106 फॅ. एवढा ताप येऊ शकतो.
 2. ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेच्या खाली 2 ते 5 से.मी. आकाराच्या घट्ट गाठी येतात. विशेषतः डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात.
 3. या गाठी कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर ब-याच कालावधी करिता अथवा कायमच राहू शकतात.
 4. तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत देखील पुरळ फोड येतात. तोंडातील पुरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठया प्रमाणात लाळ गळत राहते.
 5. तोंड, अन्न नलिका, श्वसन नलिका व फुफ्फुसामध्ये पुरळ व अल्सर निर्माण होऊ शकतात.
 6. जनावरांचे पाय, मान व बाह्य जननेंद्रियामध्ये सुज आल्यामुळे जनावरास हालचाल करण्यास
 7. अशक्तपणा, भूक कमी होणे व वजन कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
 8. पायावर सूज येते. Lampi Virus in Marathi
 9. एक किंवा दोन्ही डोळयामध्ये जखमा तयार होतात.
 10. गाभण जनावरांचा गर्भपात होऊ शकतो.
 11. बाधित जनावरे 2 ते 3 आठवडयात बरी होतात.

रोग नमुने गोळा करण्याकरिता सूचना

 1. सर्वेक्षणाच्या वेळी रोग नमुने गोळा करत असताना किंवा बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना पीपीई किटचा / फेस मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा.
 2. हात धुऊन घ्यावेत व तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे, तसेच एकवेळा वापर होणाऱ्या साधन सामग्रीची योग्यरित्या विल्हेवाट लावावी.
 3. बाधित / संशयीत क्षेत्रातील जनावरांची रक्त, रक्तजल व त्वचेवरील खपल्यांचे नमूने गोळा करुन खास दुतामार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ (NIHSAD) यांचेकडे त्वरीत पाठविण्यात यावेत.
 4. रक्त :- EDTA युक्त निर्जंतूक व्हॅक्युटेनरमध्ये संशयीत जनावराचे रक्त नमुना (5 मि.ली.) गोळा करून 4 सें.ग्रेड तापमानास राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांचेकडे पाठविण्यापूर्वीपर्यंत साठवून ठेवावा, रोग प्रादुर्भावाच्या गावातून कमीत कमी 5 नमुने गोळा करावेत. (Lampi Virus in Marathi)
 5. रक्तजल :- गोळा केलेले रक्तजल नमुने निर्जतुक व्हॅक्यूटेनरमध्ये 4 सें. ग्रेड तापमानास राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांचेकडे पाठविण्यापूर्वी पर्यंत साठवून ठेवावेत. NIHSAD भोपाळ प्रयोगशाळेस पाठविण्याकरिता 48 तासापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर रक्तजल नमूने ड्राय आईस वर पाठवावेत.
 6. त्वचा नमुने (SCABs) :- प्रत्येक संशयित जनावराचे 2 ते 4 त्वचा नमूने / खपल्या निर्जतुक कुपी मध्ये (Container) 4 ते 5 मि.ली. VIM / PBS सह 4 सें. ग्रेड तापमानास राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांचेकडे पाठविण्यापूर्वीपर्यंत साठवून ठेवावेत. NIHSAD, भोपाळ प्रयोगशाळेस पाठविण्याकरिता 48 तासापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर रक्तजल नमूने ड्राय आईसवर पाठवावेत.
 7. डोळे, नाक व तोंडातील स्टॅब निर्जंतूक स्वॅब वापरून डोळे, नाक व तोंडातील नमूने निर्जंतूक नळीत 1 मि.ली. VTM / PBS सह 4 से ग्रेड तापमानास राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांचेकडे पाठविण्यापूर्वीपर्यंत साठवून ठेवावेत. NIHSAD, भोपाळ प्रयोगशाळेस पाठविण्याकरिता 48 तासापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर रक्तजल नमूने ड्राय आईसवर पाठवावेत. [Lampi Virus in Marathi]

रोग नियंत्रण (प्रतिबंध, लसीकरण, व्हेक्टर कंट्रोल आणि उपचार)

सदर रोग हा संसर्गजन्य असल्याने रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता आवश्यकती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. {Lampi Virus in Marathi}

महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 17 जून 2022 अन्वये लंपी स्किन डिसीज या अनुसुचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी जिल्हयांचे जिल्हाधिकारी यांना प्राण्यांमधील संकारमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (सन 2009 चा क्र. 27) यांच्या कलम 36 द्वारे शासनाने अधिकार वापरण्यासाठी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांचे संबंधीत अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांतर्गत असलेले सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. (प्रत सलंग्न) या उक्त अधिसूचनेद्वारे जिल्हास्तरावर तात्काळ कार्यवाही करण्यात करावी.

प्रतिबंध

 1.  या रोगाच्या लक्षणांबाबत वर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेने त्यांचे कार्यक्षेत्रात सतत सर्वेक्षण सुरु ठेऊन बाधीत जनावर आढळल्यास त्याबाबत उपचार व लसीकरणाची कार्यवाही करावी. त्याच बरोबर आजारी जनावरांचे उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने घेण्यात यावे य स्वतंत्ररित्या सूचित केलेल्या कार्यपध्दतीनुसार राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांचे कडे त्वरीत पाठविण्यात यावेत. (Lampi Virus in Marathi)
 2. ज्या जिल्ह्यामध्ये रोग प्रादुर्भाव आढळून येईल तेथील रोग प्रादुर्भावाची ठिकाणे त्या जिल्ह्यांच्या सिमेवर असल्यास व त्या लगतच्या जिल्ह्यात रोग प्रादुर्भाव अस्तित्वात नसला तरी अशा सिमेवरील रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. च्या त्रिज्येमध्ये येणा-या लगतच्या जिल्ह्यातील गावांमध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे.
 3. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
 4. तसेच गाई व म्हशी एकत्र बांधल्या जात असल्यास, म्हशींना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी.
 5. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठयात आणू नयेत.
 6. बाधीत गावांमध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरीता तसेच चराई करता स्वतंत्र व्यवस्था करावी.
 7. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा तसेच गोठ्यास त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. [Lampi Virus in Marathi]
 8. प्रादुर्भाव ग्रस्त भागातील जनावरांची व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालीवर बंधन आणणे तसेच प्रादुर्भाव ग्रस्त भागातील तसेच 10 कि मी परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशु-प्रदर्शने इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने दि. 17 जून 2022 च्या अधिसूचने नुसार संबंधीत जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना कार्यवाही बाबत त्वरित कळविण्यात यावे.
 9. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करावे. याकरिता 1 टक्का फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराइट, फिनॉल 2 टक्के याचा वापर करता येईल. {Lampi Virus in Marathi}
 10. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. तसेच मृतदेहाच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
 11. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे बाधीत वळू पासून वीर्यमात्रा बनविण्यासाठी वीर्य संकलन थांबवावे. अशा वळूचे रक्त व वीर्य नमुने पीसीआर चाचणी करिता पाठविण्यात यावेत. केवळ या रोगाकरिता नकारार्थी असलेल्या वळूचेच वीर्य संकलन करावे अथवा असाच वळू नैसर्गिक संयोगा करिता वापरावा.
 12. बाधित क्षेत्रात व इतर सर्व ठिकाणी या आजाराबाबत पशुपालकांना विविध माध्यमांद्वारे माहिती द्यावी.
 13. प्रादुर्भाव ग्रस्त गावात / फार्मवर संबंधीत पशुवैद्यकिय संस्था प्रमुखाने प्रादुर्भाव संपूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नियमितपणे भेट देणे अनिवार्य आहे. या प्रसंगी भेट देणा-या अधिकारी / कर्मचारी यांनी इतरत्र रोग प्रसार होणार नाही याची गंभीरतेणे दक्षता घ्यावी. {Lampi Virus in Marathi}

लसीकरण

 1.  बाधीत गावांमध्ये तसेच बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाच्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना 1 मिली प्रति जनावर याप्रमाणे गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन लस रोगग्रस्त जनावरे वगळता इतरांना कातडी खाली टोचण्यात यावी.
 2. प्रत्येक जनावराकरिता स्वतंत्र सुई वापरण्याची दक्षता घ्यावी.
 3. लस उपलब्धते करिता सहआयुक्त पशुसंवर्धन, पशुवैदयकिय जैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे यांनी कार्यवाही करावी. तसेच लसमात्रांची तात्काळ आवश्यकता भासल्यास बाधीत जिल्हयास जिल्हास्तरावर लसमात्रा उपलब्ध करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्याची व्यवस्था करावी.

व्हेक्टर कंट्रोल

 1. सदर रोगाचा प्रसार बाह्य किटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात यासाठीच्या औषधांची योग्य त्या प्रमाणात फवारणी करण्यात यावी.
 2. गोठा स्वच्छ ठेवावा व गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. \”Lampi Virus in Marathi\”

उपचार

 1. लंपी स्कीन डिसीज आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकार शक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने 5 ते 7 दिवस प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
 2. त्यासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्व अ ब ई या औषधांचा वापर करावा.
 3. त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
 4. तसेच वेदनाशामक व अँटी हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
 5. जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
 6. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते. \’Lampi Virus in Marathi\’

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment