SEO म्हणजे काय? । What is SEO in Marathi?

By Shubham Pawar

Published on:

What is SEO in Marathi? नमस्कार मित्रांनो कसे आहात, आज आपण मराठी वेबसाईट च्या seo बद्दल बोलणार आहोत म्हणजेच मराठी वेबसाईट च्या सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन बद्दल आज आपण बोलू व मी हि आपली मराठी कन्टेन्ट डॉट कॉम ब्लॉग  वेबसाईट अवघ्या सहा महिन्यात कशी गुगल वर रँक केली याबद्दल सर्व मी वापरलेले seo  hacks  मी तुम्हाला या पोस्ट च्या माध्यमातून सांगणार आहेत मी या ब्लॉग वॉर माझे अनुभवातून माहिती share  करत असतो आणि तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर मी याआधी लिहिलेले  blogging वरील article नक्की वाचावे तुम्हाला खूप मदत होईल तुम्ही वेबसाईट वर जाऊन ब्लॉगिंग या section  मध्ये सर्व आर्टिकल वाचू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SEO म्हणजे काय । what is SEO in Marathi

तर असे समजावे गुगल एक स्मार्ट सर्च इंजिन नसून एक नवशिक्या बॉट आहे आणि त्याला आपल्या वेबसाईट काही समजणार नाही आणि तो काही आपली वेबसाईट आपोआप गुगल सर्च मध्ये दाखवणार नाही तर आता ह्या नवशिक्या गुगल बॉट ला काही गोष्टी सोप्या करून द्याव्या लागतात जेणेकरून तो त्या गोष्टी त्याच्या सर्च result  मध्ये दाखवेल याच प्रक्रियेला साधारणपणे SEO म्हणतात, आणि त्याचेही दोन प्रकार आहेत on  page seo आणि off page seo

on page seo

 • आपली वेबसाईट किंवा ब्लॉग अश्या पद्धतीने लिहिणे ज्यामुळे गुगलला शोधायला सोपे जाईल आणि अश्याच सुटसुटीत लिहिलेल्या
 • आणि सर्व लेखनाच्या टूल्स चा वापर करून लिहिलेल्या ब्लॉग पोस्ट ला seo  fiendly  ब्लॉगपोस्ट म्हणतात,
 • मग यामध्ये तुम्ही सलग एखादी माहिती न लिहिता त्यामध्ये वेळोवेळी पॅराग्राफ पाडावेत प्रत्येक मुद्द्याला सुरुवात करताना योग्य हेडिंग subheading द्यावे
 • जेणेकरून लिखाण मुद्देसूद दिसेल अगदी तसेच जसे आपण शाळा कॉलेज मधील उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला impress  करण्यासाठी लिहायचो,
 • असे लिखाण करण्यालाच on  page seo असे म्हणतात on  page  seo in marathi करताना तुम्ही किवर्ड रिसर्च करून ते किवर्ड त्या विषयाच्या ब्लॉग पोस्ट मध्ये वापरणे गरजेचे आहे, किवर्ड रिसर्च बद्दल जाणून घेण्यासाठी टिप्पण्यांमध्ये सांगा.

Free Digital Marketing PDF Download

 Off Page Seo

 • आता मी गृहीत धरतो कि तुम्ही on  page  seo तुमच्या ब्लॉग मध्ये केला आहे आणि तुम्हाला आता off  page  seo  करायचा आहे
 • off page seo हा आपल्या ब्लॉग च्या बाहेर केला जातो ज्याचा मूळ उद्देश्य आपल्या ब्लॉग ची authority वाढविणे
 • ब्लॉग ची authority  तेव्हाच वाढते जेव्हा आपण पुढील गोष्टींकडे लक्ष देऊ,

मजबूत Backlinks बनवणे

एक strong बॅकलिंक त्याला म्हणता येईल जी जास्त authority असणाऱ्या वेबसाईट वरून आपल्या ब्लॉग ला मिळेल मुळात backlink ला आपण अश्याप्रकारे समजू शकतो एकदा व्यक्ती स्वतःच्या बळावर एखाद्या ठिकाणी काम करतो स्वतःच्या मेहनतीने तो भविष्यात पुढे जाईलच पण एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्याच्या काम करण्याच्या ठिकाणी शिफारस केली तर त्याचे अधिकार वाढून त्याची लवकर पदोन्नती होण्याची संधी वाढते. तसेच जर एखाद्या मोठ्या ब्लॉग किंवा वेबसाईट ने जर तुमच्या website ला बॅकलिंक दिली तर गुगल च्या नजरेत तुमच्या वेबसाईट ची किंमतही वाढते आणि तुमच्याही ब्लॉग ची ऑथॉरिटी लवकर वाढण्यास मदत होते.

backlinks आपण कश्याप्रकारे मिळवू शकतो?

 1. backlinks दोन प्रकारच्या असतात dofollow आणि nofollow
 2. Nofollow backlink मिळवणे खूप सोपे असते dofollow backlink मिळवण्याच्या तुलनेत
 3. हेच कारण आहे की dofollow link ही nofollow लिंक पेक्षा जास्त प्रभावी असते.

Nofollow backlink कशी मिळवाल?

Social Media वर कुठल्याही domain authority ची श्रेणी हि शून्य ते शंभर या दरम्यान असते, सोशल मीडिया वेबसाईट जसे कि facebook, twitter यांची डोमेन ऑथॉरिटी लोकप्रियतेमुळे 90 च्या वर आहे त्यांच्याकडून nofollow बॅकलिंक मिळवण्यासाठी आपण आपल्या ब्लॉग पोस्ट्स किंवा वेबसाईट लिंक्स आपल्या वेबसाईट च्या विषयाच्या page, group, यांच्या माध्यमातून share करू शकतो त्यावर क्लिक करून लोक आपल्या वेबसाईट वर पोहोचल्यावर आपल्याला त्या वेबसाईट वरून nofollow बॅकलिंक मिळते.

forum वेबसाईट वर उत्तरे देणे

 • हा एक खूप चांगला मार्ग आहे nofollow backlinks मिळवण्याचा यामध्ये तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या ब्लॉग ज्या विषयाशी निगडित आहे
 • तश्याप्रकारच्या प्रश्नांना quora आणि reddit यांसारख्या प्रश्न विचारल्या जाणाऱ्या वेबसाईट वर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत
 • आणि त्याखाली आपल्या ब्लॉग वरील मूळ पोस्ट ची लिंकसुद्धा द्यायची आहे हा backlinks मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
 • इतक्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरून तुम्ही nofollow backlinks मिळवू शकता आता बघूया

dofollow backlinks कश्या मिळवायच्या.

गेस्टपोस्टिंग करून
गेस्टपोस्टिंग करून बॅकलिंक्स मिळवणे हा एक यशस्वी आणि प्रभावी मार्ग आहे dofollow backlinks मिळवण्याचा करण मी याआधीही सांगितले आहे की dofollw links ह्या गुगल मध्ये rank करण्यासाठी किती प्रभावी असतात, तर गेस्टपोस्टिंग विषयी पुढील लिंकवर सविस्तर वाचा गेस्टपोस्टिंग आणि या पोस्टमधील काही मुद्दे समजले नसतील तर टिप्पण्या मध्ये सांगा, नवीन पोस्ट मध्ये त्यांचा समावेश नक्की होईल.
Author Bio

Marathi Content

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “SEO म्हणजे काय? । What is SEO in Marathi?”

Leave a comment