मागेल त्याला विहीर 4 लाख रू. अनुदान मिळणार | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Published on:

Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 – मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल. {Vihir Anudan Yojana Maharashtra 2023}

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

लाभधारकाची निवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

  • अनुसूचित जमाती क) भटक्या जमाती
  • निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री– कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम
  • 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
  • सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
  • अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा) [Vihir Anudan Yojana Maharashtra 2023]

 लाभधारकाची पात्रता

  •  लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • महाराष्ट्र भुजल ( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
  • दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
  • दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
  • लाभधारकाच्या 7/12 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
  • एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

विहीरीसाठी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

3 thoughts on “मागेल त्याला विहीर 4 लाख रू. अनुदान मिळणार | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023”

Leave a Comment