वारकऱ्यांना ५ लाख रुपये मिळणार अनुदान, वारकरी विमा छत्र योजना Varkari Vima Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

Varkari Vima Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमस्कार मित्रांनो, आज आपण वारकऱ्यांना ५ लाख रुपये मिळणार अनुदान, वारकरी विमा छत्र योजना Varkari Vima Yojana या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत . मित्रांनो जर तुम्हाला वारकरी विमा छत्र योजनेचा लाभ घ्यायचा असेल , आणि ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान हवं असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो, पाहुयात काय आहे वारकरी छत्र योजना Varkari Vima Yojana Maharashtra 2024 , लाभार्थी ची पात्रता काय असेल , आवश्यक कागदपत्रे , अटी – नियम काय असतील वारकरी छत्र योजनेचे लाभ कोणते ? वारकरी छत्र योजना साथी अर्ज कसा करायचा ? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र मध्ये दर वर्षी आषाढी एकादशी निमित्त वारी निघते , सर्व वारकरी वेगवेगळ्या गावातून , शहरातून ह्या वारीमध्ये सहभागी होतात. ह्या वर्षी सरकार ने पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’; (Varkari Vima Yojana Maharashtra) जारी केली आहे.

वारकरी विमा छत्र योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

Varkari Vima Yojana वारीच्या कालावधी दरम्यान जे काही अपघात तसेच दुर्घटना वारकरी बांधवांसोबत घडुन येत असतात.ज्यात वारकरी बांधव गंभीर जखमी होतात त्यांना अपंगत्व विकलांगता येते किंवा काही वेळा त्यांचा ह्या दुर्घटनेत मृत्यू देखील होतो. अशा वारकरी बांधवांच्या परीवारास आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ Varkari Vima Yojana Maharashtra सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ Varkari Vima Yojana Maharashtra याची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल :-

(१) दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी रु.५,००,०००/- (रुपये पाच लाख फक्त) शासनाकडून वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

(२) याव्यतिरिक्त,

 विमा योजना 2024 राबविण्यात येईल स्वरुप पुढीलप्रमाणे राहील

  1. दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल :
  2. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात / पाय व एक डोळा निकामी झाल्यास रु.१,००,०००/-
  3. एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास रु.५०,०००/-
  4. वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रु. ३५,०००/- किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल.
  5. सदर विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी परिशिष्ट-अ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

विठ्ठल रखुमाई Varkari Vima Yojana Maharashtra अपघात विम्या संबधी तरतुदी

विमा रक्कमरु १,००,००० /- [ कंपनीकडून ]
विमा हफ्तारु १८ /- [ प्रति १ लाख विमा रकमेवरती ]
विमा कालावधी३० दिवस
विमा रक्कम१,००,००० [ CSI ]
अ. क्र.अपघाताचे स्वरूपटक्केवारी
अपघातामुळे आलेला मृत्यू१००% विमा रक्कम [ CSI ]
अपघातात दोन हात , दोन पाय , दोन डोळे , एक हात / पाय व एक डोळा१००% विमा रक्कम [ CSI ]
एक हात , एक पाय व एक डोळा५०% विमा रक्कम [ CSI ]
कायमचे अपंगत्व / विकलांगता१००% विमा रक्कम [ CSI ]
वैद्यकीय उपचाराचा खर्चप्रत्यक्ष खर्च किंवा ३५,०००/- यापैकी जे कमी असेल ते

संजय गांधी निराधार योजना लगेच करा अर्ज Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 

वारकरी छत्र योजनेसाठी
लाभार्थी पात्रता :
Varkari Vima Yojana Maharashtra
१) समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करणेसाठी सदरील समूहाचे स्तरावर प्रबंधन करणेसाठी आवश्यक ती यंत्रणा / समिती स्थापन करण्यात येईल.
२) सदरील योजनेकरिता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले (Unnamed Policy) विमा पत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरिता वारकरी हा गट विनिर्दिष्ट करण्यात येत आहे.
३) ज्यादिवशी विमाहप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून तीस दिवसांपर्यंत त्याची मुदत राहील.
४) एखादी व्यक्ती सदर कालावधीत मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा कसे याची पडताळणी करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालाकडून तसे प्रमाणित करण्यात येईल..
५) सदर विमापत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्याची संख्या समाविष्ट करण्यात येईल.
६) सदर विमापत्रकात खालील कारणांकरिता लाभ देय होणार नाही.
1) आत्महत्या वा तसा प्रयत्न
II) अमली अथवा मादक पदार्थांच्या अंमलाखाली मृत्यू
III) प्रसुती अथवा बाळंतपणादरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास
IV) गुन्हेगारी उद्देशाने कोणात्याही कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता
V गुप्त रोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता
VI) किरणोत्सर्ग,अणुभटटया, युध्द व बंड इत्यादी तत्सम कारणांमुळे उद्भवलेला मृत्यू किंवा विकलांगता.
७) विमा पत्राअंतर्गत वैद्यकीय उपचाराकरिता झालेला प्रत्यक्ष खर्च अथवा जास्तीत जास्त रु. ३५,०००/- विमारक्कम देय राहील.
 Conclusion :
मित्रांनो , या पोस्टमध्ये आम्ही वारकरी छत्र योजना Varkari Vima Yojana Maharashtra या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि – वारकऱ्यांना ५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे , त्याचे अटी , नियम , पात्रता काय असेल , त्याचे उद्दिष्ट इत्यादी मला आशा आहे कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल
धन्यवाद !

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

बांधकाम कामगार 5,000 रु. योजना अर्ज | Bandhkam Kamgar Yojana 2024

लखपती दीदी महिला लखपती होणार, करा अर्ज : Lakhpati Didi Yojana Maharashtra

मुलांना महिन्याला 2,250 रु. मिळतात करा अर्ज : Bal Sangopan Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाहाला 2.5 लाख रुपये मिळतात करा अर्ज : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra