10वी / 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप अर्ज सुरू

By Shubham Pawar

Published on:

tenth and twelfth pass students will get scholarships
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune: पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रू. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रू. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे.

सदरचे अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देणेत येणार आहे. इ. १० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या
dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती भरणे आहे. (10th / 12th pass students will get scholarship)

योजनेचे नाव व तपशील

  • भारत मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना- सन 2024 (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १०/ इ. १२ मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थ्यी यांनी किमान ७०% आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बॉयोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.
  • लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना- शैक्षणिक अर्थसहाय्य हे इ.१०/ १२ वी नंतर शासनमान्य/ विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्याच मिळेल.

उपरोक्त योजनेचे अर्ज दि.१३ ऑक्टोबर २०२१ ते दि.३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती भरणेत यावेत.
या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात यावे.

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

बांधकाम कामगार 5,000 रु. योजना अर्ज | Bandhkam Kamgar Yojana 2024

लखपती दीदी महिला लखपती होणार, करा अर्ज : Lakhpati Didi Yojana Maharashtra

मुलांना महिन्याला 2,250 रु. मिळतात करा अर्ज : Bal Sangopan Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाहाला 2.5 लाख रुपये मिळतात करा अर्ज : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

Leave a comment