सिंधु पाणी वाटप करार काय आहे? | Sindhu Pani Vatap Karar in Marathi

Sindhu Pani Vatap Karar in Marathi – सिंधु पाणी वाटप करार हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेला नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भातला करार आहे.

Sindhu Pani Vatap Karar in Marathi

सिंधु नदी आणि तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात जागतिक बँकेच्या पुढाकाराने दोन देशांत करार करण्यात आला. Sindhu Pani Vatap Karar in Marathi जवळपास दहा वर्षे वाटाघाटी झाल्यानंतर उभय देशांनी पाकिस्तानात कराची येथे 19 सप्टेंबर 1960 ला स्वाक्षऱ्या केल्या.

सिंधू नदी व्यवस्थेत सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज यांचा समावेश होतो. सिंधू नदीचे खोरे प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले असून, चीन आणि अफगाणिस्तान यांचाही थोडा वाटा आहे.

सिंधु पाणी वाटप करार काय आहे

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये सिंधू नदी करार झाला. त्याअंतर्गत रावी, सतलज आणि बियास या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले.

भारताची विकासाची सद्यस्थिती

माधोपूर खाली रावीचे भारताच्या वाट्याचे वाहून जात असलेले पाणी वापरण्याचा निर्णय भारताने घेतला असून, पुढील पावले उचलण्यात आली आहेत.

शाहपूरकांडी प्रकल्प

जम्मू-काश्मीर आणि पंजाब या दोन राज्यांमधील वादामुळे 20 ऑगस्ट 2014 पासून प्रकल्पाचे काम बंद होते. दोन्ही राज्यात 8 सप्टेंबर 2018 ला सहमती झाली. 19 डिसेंबर 2018 ला केंद्र सरकारने या प्रकल्पाला 485.38 कोटी रुपयांचे केंद्रीय साहाय्‍य मंजूर केले. सध्या पंजाब सरकार भारत सरकारच्या देखरेखीखाली प्रकल्पाचे काम करत आहे. Sindhu Pani Vatap Karar in Marathi

Sindhu Pani Vatap Karar in Marathi

उज बहुविध प्रकल्पाचे बांधकाम 

उज, रावीची उपनदी असून, या प्रकल्पातून 781 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होणार आहे. प्रकल्पातून ऊर्जानिर्मितीही केली जाणार असून, जुलै 2017 मध्ये प्रकल्पाच्या डीपीआरला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

उजच्या खाली दुसरी रावी बियास जोडणी

रावीचे पाकिस्तानला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उपयोगात आणण्यासाठी हा प्रकल्प आहे. भारत सरकारने हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.

सिंधु पाणी वाटप करार कधी झाला?

1960 मध्ये सिंधू नदी करार झाला

Leave a Comment

close button