सोलर कुंपण योजना 75% अनुदानावर सुरू | Saur Fencing Subsidy Maharashtra

Saur Fencing Subsidy Maharashtra – गावातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढविणे, गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे.

पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे व गावक-यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे व या माध्यमातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या सीमेच्या २ कि.मी. आतील संवेदनशील गावांमध्ये संदर्भ-1च्या शासन निर्णयानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना सुरु करण्यात आली. Saur Kumpan Yojana

Saur Fencing Subsidy Maharashtra

या योजनेस गावक-यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून सदर योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राणी भ्रमण मार्गातील गावे, ग्रामवन असलेली गावे व संरक्षित क्षेत्रामधून पुर्नवसीत गावे यांचा सदर योजनेत संदर्भ क्र. 2चे शासन निर्णयानुसार समावेश करण्यात आला.

सदर योजने अंतर्गत वनाशेजारील गावातील 100% कुटुंबांना स्वयंपाक गॅस (LPG) पुरवठा करण्याची अतिरिक्त बाब संदर्भ क्र. 3चे शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आली.

तद्नंतर, संदर्भ क्र. 4 व 5 चे शासन निर्णयानुसार सदर योजने अंतर्गत वन्यप्राण्यांकडून शेत पिकाची नुकसानी थांबविण्यासाठी सामुहीक चेनलिंक फेन्सिंग ही बाब समाविष्ट करण्यात आली. solar kumpan yojana

सोलर कुंपण योजना 75% अनुदानावर सुरू

मागील काही वर्षात नवेगांव-नागझिरा व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे गावातील शेतकरी लाभार्थीना प्रायोगिक तत्वावर व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्यात आले.

सदर प्रयोगाचे अवलोकन केले असता सौर ऊर्जा कुंपणाची किंमत लोखंडी जाळीच्या कुंपणाच्या तुलनेत अत्यल्प आहे, तसेच वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता कमी आहे आणि हंगाम संपल्यानंतर कुंपण काढून ठेवणे शक्य आहे.

जेणेकरुन वन्यप्राणी भ्रमणमार्ग पुनश्च सुरळीत होतात. अशा विविध कारणांमुळे सौर कुंपणाचे प्रत्यक्षात फायदे जास्त असून त्याची स्वीकार्यता वाढलेली आहे. Saur Urja Kumpan Yojana

Saur Fencing Subsidy Maharashtra

सदरचे अनुभवामुळे व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्याबाबत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत विशेष तरतूद असावी अशी मागणी पुढे येत आहे.

लोखंडी जाळीचे कुंपणाचे योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, त्याकरिता लागणारा निधी व लोखंडी जाळीचे कुंपणाच्या तुलनेत सौर ऊर्जा कुंपणाची उपयुक्तता या सर्व बाबींचा विचार करुन संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रासाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे शासनाचे विचाराधीन होते.

त्याअनुषंगाने आता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे

योजनेचे नावमहाराष्ट्र सोलर कुंपण योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील शेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना सोलर कुंपण पुरवणे
अर्ज प्रक्रियाOFFLINE
वेबसाईटmaharashtra.gov.in

सौर ऊर्जा कुंपणाकरीता लाभाचे स्वरुप

संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येईल. निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास करण्यात येईल.

याकरीता प्रतिलाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75% किंवा रूपये 15,000/- या पैकी जी कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत 25% किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा लाभार्थ्याचा राहील.

कार्यान्वयीन यंत्रणा

दिनांक 04-08-2015 च्या शासन निर्णयामधील परिच्छेद 2.01 मध्ये नमूद केलेप्रमाणे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याची कार्यवाही ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत राबविण्यात येईल.

ज्या गावात ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात नसेल तेथे समिती गठीत करावी.

सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्यासाठी संवेदनशील गावांची निवड

 1. सौर ऊर्जा कुंपण ही बाब डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेचा एक भाग म्हणून कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याकरीता सद्य:स्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत गावांची निवड करण्यासाठीचे निकष या बाबीस लागू राहतील.
 2.  वनवृत्तनिहाय वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतपीक नुकसानीच्या मागील तीन वर्षातील गावनिहाय घटनांच्या संख्येच्या अनुषंगाने प्राथम्यक्रमानुसार संवेदनशील गावांची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षक / वनसंरक्षक (प्रादेशिक / वन्यजीव) हे तयार करतील.

लाभार्थ्यांचे निवडीचे निकष

 1.  सदर लाभार्थीकडे गावातील शेतीचा 7/12, गाव नमुना 8 अथवा वनहक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील.
 2. लाभार्थी हा गावातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तथापि, एखाद्या व्यक्तीकडे मुद्या क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अट लागू राहणार नाही.
 3. ज्या व्यक्तीवर वनगुन्हा नोंदविण्यात आला असेल अशा व्यक्तीस योजनेचा लाभ देय असणार नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्टयासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यास सदर योजनेचा लाभ देय राहील.
 4. या योजने अंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण अथवा सामुहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ अनुज्ञेय राहील.

लाभार्थी निवड करण्याची कार्यपध्दती

 1.  संवेदनशील गावाची निवड झाल्यावर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवश्यक माहिती ग्रामपंचायत सुचनाफलकावर प्रसिद्ध करावी.
 2. अर्जदारांनी सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील.
 3. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीने अर्जदारांची पात्रता निश्चित केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्फत उपवनसंरक्षक यांचेकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा.

साहित्य वाटप करण्याची कार्यपद्धती

 1. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती/ संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्याने उर्वरीत 25% किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा समिती कडे जमा करावी.
 2. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती नियुक्त पुरवठादाराकडून साहित्याचा पुरवठा करून घेईल.
 3. नियुक्त पुरवठादाराकडून पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी समितीद्वारे वन परिक्षेत्र अधिकारी व लाभार्थी यांच्या उपस्थितीत करेल. पुरवठा करण्यात आलेले साहित्य निश्चित करण्यात आलेल्या मापदंडानुसार असल्यास साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येईल.
 4. तसेच संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून पुरवठाधारकास पुरवठा केलेल्या साहित्याची रक्कम RTGS / NEFT द्वारे वितरीत करावी.
 5. शासनाकडून प्राप्त झालेला निधी गावातील पात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या निधी पेक्षा कमी असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची निवड संबंधित संयुक्त वनव्यवस्थापन समिती / ग्राम परिस्थितीकीय विकास समितीने करावी.

लाभार्थी जबाबदारी

 1.  लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा कुंपणाची देखभाल स्वत: करावयाची असून शेतात पिकं नसताना सौर ऊर्जा कुंपण काढून ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची राहील.
 2. या योजने अंतर्गत खरेदी केलेले वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण विकणार नाही, हस्तांतरीत करणार नाही तसेच त्याचा दुरुपयोग करणार नाही व या अटींचा भंग झाल्यास लाभार्थ्यास त्यापुढे वनविभागामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही योजनेचे लाभ देय राहणार नाही.

निधीचे स्रोत

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना लेखाशीर्ष (24068711) मधील उद्दिष्ट 50 ईतर खर्च अंतर्गत खर्च करण्यात येईल.

या व्यतिरिक्त शासनाच्या इतर राज्य योजनांतून, जिल्हा योजनेतून, आदिवासी विकास योजना. विशेष घटक योजना, व्याघ्र प्रतिष्ठान, खासदार व आमदार निधीमधुन तसेच मानव विकास मिशन, CSR, जिल्हा सबलीकरण निधी, जिल्हास्तरीय इतर उपलब्ध स्त्रोतांमधून व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपणाकरिता निधी उपलब्ध करून देता येईल.

 

 

सौर कुंपण योजनेला अनुदान किती आहे?

शासन निर्णय नुसार सौर कुंपणाला ७५% अनुदान आहे.

सौर कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा?

अर्जदारांनी सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील.

2 thoughts on “सोलर कुंपण योजना 75% अनुदानावर सुरू | Saur Fencing Subsidy Maharashtra”

Leave a Comment

close button