आता रेशनकार्ड मिळणार ऑनलाईन, राज्य सरकारचा मोठा निर्णय Ration Card Online Maharashtra 2023

By Shubham Pawar

Published on:

Ration Card Online Maharashtra 2023 रेशनकार्ड मिळणार ऑनलाइन, राज्य सरकारचा निर्णय, सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबणार.

Ration Card Online Maharashtra 2023

रेशनकार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन रेशनकार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशनकार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या युक्तीचा सरकारी कार्यालयांमध्ये काम करताना सामान्यांना अनुभव येतो. सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठी तहसील कार्यालये, परिमंडळ कार्यालयांचे उंबरठे. झिजवावे लागतात. त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणूक करण्यात येत होती.

अनेकांनी तर तहसील आणि परिमंडळ कार्यालयात रेशनकार्डसाठी दुकाने थाटली होती. रेशनकार्ड काढण्यासाठी एजंटांना पैसे दिल्याशिवाय कार्ड मिळत नव्हते. त्यामुळे रेशनकार्ड कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणात एजंटाचा सुळसुळाट झाला होता. वीस रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशनकार्डसाठी नागरिकांना दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे सामान्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. Ration Card Online Maharashtra 2023

रेशनकार्ड ऑनलाइन मिळणार

रेशनकार्डसाठी नागरिकांना वीस रुपयांचे शुल्क द्यावे लागत होते. आता रेशनकार्ड मोफत आणि तेही ऑनलाइन मिळणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना; तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे.

अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी http:// remc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून ही ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल. {Ration Card Online Maharashtra 2023 }

 वीस दिवसांची मुदत

ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी संकलित करणार आहेत. त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरून त्याचे रेशनकार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड देतानां पूर्वीचीच 20 दिवसांची मुदत असणार आहे.

पांढरे रेशनकार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे सात दिवस लागणार आहे. रेशनकार्ड अंतिम झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. त्यात रेशनसाठी त्याला कोणते दुकान मिळाले आहे, याचाही उल्लेख असणार आहे. Ration Card Online Maharashtra 2023

टीप – Conclusion

 ऑनलाइन रेशनकार्ड मिळण्याच्या पद्धतीमुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. या संदर्भातील माहिती ऑनलाइनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.

रेशनकार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. ऑनलाइन सुविधेमुळे या लॉबीतून नागरिकांची सुटका होणार आहे. Ration Card Online Maharashtra 2023

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment