PMKVY कौशल्य विकास योजना अर्ज महाराष्ट्र | PMKVY Kaushalya Vikas Yojana Maharashtra detailed Information

By Marathi Corner

Published on:

नमस्कार मित्रांनो ,आज आपण PMKVY कौशल्य विकास योजना महाराष्ट्र (PMKVY kaushalya vikas yojana maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे कौशल्य विकास योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

PMKVY kaushalya vikas yojana maharashtra ही केंद्र सरकार द्वारे दिले जाणारी प्रमुख अशी एक योजना आहे की जी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) मंत्रालया द्वारे दिले जाते. 2015 पासून ही योजना राबवली जात आहे. यामध्ये इतक्या वर्षांमध्ये अनेक बदल झालेले आहेत व लाखो लोकांनी याचा फायदा देखील घेतलेला आहे. योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्याद्वारे कार्यान्वित केली जाते. यामध्ये मुख्य फायदा असा आहे की इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असलेले कौशल्य ट्रेनिंग युवकांना दिले जाते. त्याचे सर्टिफिकेट देखील मिळते व त्याद्वारे त्यांना रोजगार देखील उपलब्ध होतो. आधीपासून अनुभव असणारे गरजू युवक देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना तुम्हाला मदत करेल. ज्याला प्लेसमेंट असिस्टंट असे देखील म्हटले जाते.

PMKVY kaushalya vikas yojana maharashtra या योजनेमध्ये लाभधारकांना 150 ते 300 तासांचे एक अल्पकालीन ट्रेनिंग दिले जाते. तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहात तेथे तुम्हाला बायोमेट्रिक अटेंडन्स द्यावी लागते. या योजनेतील लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिला जातो. काही विद्यार्थी जर त्यांच्या ट्रेनिंग मध्ये पास होऊ नाही शकले किंवा ट्रेनिंग पूर्ण करू नाही शकले तर त्यांना पुन्हा एकदा ते ट्रेनिंग करता येईल.

PMKVY Kaushalya Vikas Yojana Maharashtra

लाभ

 • या योजनेद्वारे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ऑनलाईन माहिती तसेच मार्गदर्शन देणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात.
 • मार्गदर्शन साठी हेल्पलाइन उपलब्ध आहे.
 • जिल्हास्तरीय कौशल्य विकास माहिती सेंटर द्वारे देखील मार्गदर्शन केले जाते.
 • डिजिटल कन्टेन्ट उपलब्ध करून दिला जातो.
 • सॉफ्ट स्किल, उद्योजकता ,फायनान्स, डिजिटल नॉलेज दिले जाते.
 • या फायद्यासोबत अपघात विमा, स्टायपेंड देखील दिले जाते.

PMKVY kaushalya vikas yojana maharashtra पात्रता

 1. भारतीय तरुण जे बेरोजगार किंवा कॉलेज ड्रॉप आऊट असतील
 2. किमान वयोमर्यादा 18 वर्ष
 3. अधिकृत ओळखपत्र गरजेचे. उदा., आधार कार्ड, मतदान कार्ड
 4. हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक
 5. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल अशा लोकांसाठी.

कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. ओळखपत्र
 3. बँक अकाउंट पासबुक
 4. मोबाईल नंबर
 5. पासवर्ड चेंज फोटो
 6. मतदान कार्ड

ट्रेनिंग सेंटर कसे शोधावे

तुम्ही तुमच्या जवळचे ट्रेनिंग सेंटर देखील वेबसाईटवर जाऊन शोधू शकता ते कसे शोधावे याच्या स्टेप्स खाली दिले आहेत.

 1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
 2. होम पेज वरच Find a Training Centre टॅब वर क्लिक करा.
 3. नवीन पेजवर सर्च बाय सेक्टर, सर्च बाय जॉब रोल, सर्च बाय लोकेशन त्यापैकी एक निवडून माहिती भरा.
 4. पुढे सबमिट बटन वर क्लिक केल्यावर ट्रेनिंग सेंटर ची माहिती उपलब्ध होईल.

PMKVY kaushalya vikas yojana maharashtra अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला अधिकृत PMKVY च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे

 1. अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
 2. त्यानंतर “Skill India” या ऑप्शन वर क्लिक करा.
 3. पुढील आलेल्या “Candidate” वर क्लिक करा
 4. पुढील पेजवर “Register as candidate” यावर क्लिक करा.
 5. त्यानंतर फॉर्ममध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
 6. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर Captcha code टाकून “Sudmit” बटणावर क्लिक करा.
 7. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर Skill India चे PMKVY Login वर क्लिक करा.
 8. पुढे तुम्हाला User Name आणि Password टाकावा लागेल.
 9. अशाप्रकारे तुम्ही PMKVY kaushalya vikas yojana maharashtra योजनेचा अर्ज पूर्ण करू शकता.

Conclusion

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही PMKVY कौशल्य विकास योजना महाराष्ट्र (PMKVY kaushalya vikas yojana maharashtra) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. या योजनेद्वारे बेरोजगार तरुण-तरुणींना वेगवेगळ्या कौशल्यांचे ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला जातो. त्यासोबतच इतर मार्गदर्शन करिअरच्या वाढीसाठी केले जाते. उपलब्ध असलेल्या ट्रेनिंग सेंटर मधून तुम्हाला हे ट्रेनिंग मिळते. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. आतापर्यंत लाखो तरुण तरुणींनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

Leave a Comment