जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र 2023 | Jalyukta Shivar Yojana

By Shubham Pawar

Published on:

Jalyukta Shivar Yojana – महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषि क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 पासून ते सन 2018-19 पर्यंत राबविण्यात आले.

Jalyukta Shivar Yojana

जलयुक्त शिवार अभियानामध्ये एकात्मिक पध्दतीने ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधीत विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबध्दरित्या कृति आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ झाली आहे. विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे / उपचार एकूण 22593 गावात मोहिम स्वरुपात राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये 6,32,896 कामे पूर्ण झाली असून 20544 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. अभियानातंर्गत झालेल्या कामामुळे जवळपास २७ लाख टी. सी. एम. पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात येवून सुमारे 39 लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात येऊन कृषि उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणण्यात आली.

जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर या करीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरिता “जलयुक्त शिवार अभियान 2.0” राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. Jalyukta Shivar Yojana

जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र 2023

 सदर अभियानासाठी मंजूर असलेल्या तरतूदीपैकी 0.25% रक्कम जलयुक्त शिवार

अभियान 2.0 चे सनियंत्रण करण्यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान लेखाशिर्ष 4402 2781  या लेखाशिर्षाखाली रुपये 3 लक्ष पेक्षा अधिक रकमेची कामे मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता अशी वर्गवारी विचारात न घेता ई-निविदाद्वारे करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

 घेण्यात येणारी कामे :-

पाणलोट हा नियोजनाचा केंद्रबिंदू राहील. पाणलोट हा घटक समजून माथा ते पायथा या तत्वावर क्षेत्र उपचाराची व ओघळ उपचाराची सर्व अनुज्ञेय कामे हाती घेण्यात यावीत.

कामाचा प्राधान्यक्रम :- 

  •  अपुर्ण / प्रगतीपथावरील कामे.
  • क्षमता पुनःस्थापित करण्याबाबतची दुरुस्ती/ नूतनीकरणाची कामे.
  • क्षेत्र उपचार कामे.
  • नालाउपचाराची कामे.
  • लोकसहभाग / सार्वजनिक खाजगी भागीदारीतील कामे. “Jalyukta Shivar Yojana”

तांत्रिक व प्रशासकीय मान्यता :-

  •  अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणांनी प्राधान्याने त्यांच्या नियमित आर्थिक तरतुदीतून अभिसरणातून ही कामे घेण्यात यावी. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांना प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता द्यावी.
  • जी कामे अभिसरणाद्वारे इतर योजनेतून घेणे शक्य होणार नाही अशा कामांना जलयुक्त शिवार अभियान लेखाशिर्ष 4402 2781 अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देतील.
  • अभिसरणातून मान्यता देण्यात येणाऱ्या कामांना प्रचलित तरतूदीनुसार सक्षम स्तरावर प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.
  • प्रशासकीय मान्यता आदेशामध्ये निधी उपलब्धतेचे लेखाशिर्ष नमूद करणे बंधनकारक राहील. ‘Jalyukta Shivar Yojana’
  • नियमित योजनांमधून संबंधित आर्थिक वर्षात निधी उपलब्ध नसल्याचे सक्षम स्तरावरून प्रमाणित केल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान लेखाशिर्ष  4402 2781 मधून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत काय केले जाते?

गावाच्या परिसरात जास्तीत जास्त पळापळ रोखणे, विकेंद्रित जल संस्था निर्माण करणे, दुष्काळी भागात भूजल पातळी वाढवणे, लोकसहभागातून गाळ काढून जलसाठ्याची क्षमता वाढवणे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ रोखता येईल का?

JSA, किंवा ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते, त्याला “दुष्काळमुक्त महाराष्ट्र” करण्यासाठी “रणनीती” म्हणून संबोधले जाऊ शकत नाही कारण कमी पावसाच्या काळात संरचना पाणी पकडण्यात आणि टिकवून ठेवण्यास सक्षम होणार नाही.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment