पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | PM Pik Vima Yojana in Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

PM Pik Vima Yojana in Maharashtra – पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. संदर्भ क्र. 2 व 3 अन्वये सदरची योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाने संदर्भ क्र. 6 अन्वये Cup & Cap Model Beed Pattern (80:110) नुसार योजनेची अंमलबजावणी करणेकरीता मान्यता दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Pik Vima Yojana in Maharashtra

त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2024 व रब्बी 2024-25 हंगामासाठी एक वर्षाकरीता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. 6 च्या पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार विमा कंपन्याची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. खरीप 2024 व रब्बी 2024 -25 हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (80:110 – pik vima beed pattern) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

योजनेची उद्दीष्टये

  1. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याना विमा संरक्षण देणे.
  2. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  3. शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  4. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. [PM Pik Vima Yojana in Maharashtra]

PM Pik Vima योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  1.  सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
  2. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
  3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. \”PM Pik Vima Yojana in Maharashtra\”
  4. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
  5. या योजने अंतर्गत खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024-25 या एका वर्षांकरिता जोखिमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. PM Pik Vima Yojana in Maharashtra
  6. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उबरठा उत्पादन हे एक वर्ष कालावधी करिता असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करिता असेल.
  7. सदरची योजना ही एकूण 12 जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्यामार्फत एका वर्षाकरीता राबविण्यात येईल. विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या 110 टक्के पर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि, एका वर्षातील देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम, जमा विमा हप्ता रक्कमेच्या 110 टक्के पेक्षा जास्त असल्यास 110 टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्विकारेल आणि जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त 20 टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्यशासनाला परत करेल. (pik vima yojana information in marathi)
  8. जोखमीच्या बाबी योजनेअंतर्गत खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

पीक विमा योजना 2023 महाराष्ट्र हायलाइट्स 

🔥 योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2024
🔥 लाँच केले सर्व राज्यांसाठी
🔥 योजनेचे उद्दिष्ट शेतीचे रक्षण करणे
🔥 लाभार्थी भारतातील सर्व शेतकरी
🔥 फायदे शेतकर्यांना नुकसान भरपाई प्रदान करणे
🔥 अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
🔥 पिक विमा नोंदणी लिंक  इथे क्लिक करा 

 खरीप व रब्बी हंगामाकरिता 

  1.  हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (Prevented Sowing / Planting / Germination)
  2. पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid season Adversity)
  3. पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.
  4. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities).
  5. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses).

 

 योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी

या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ/मंडळगट किंवा तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल. PM Pik Vima Yojana in Maharashtra

बोगस पिक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे :-  ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पिक पेरा नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणे, अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शना नुसार सबंधित विमा कंपनीची राहील.

तसेच महसुल दस्त ऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत महसुल विभागामार्फत तहसिलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणेबाबत कार्यवाही करावी.

ई – पीक पाहणी

ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतीम गृहीत धरण्यात येईल. PM Pik Vima Yojana in Maharashtra

योजनेच्या अटी

  1. सदर विमा संरक्षणाची बाब ही विमा अधिसूचित क्षेत्रातील फक्त मुख्य पिकांना लागू राहील. विमा अधिसूचित क्षेत्रावर मुख्य पीक निश्चित करतांना जिल्हा/तालुका स्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी (Gross cropped area) किमान 25% पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक राहील. PM Pik Vima Yojana in Maharashtra
  2. अधिसूचनेपूर्वी बँकेकडून विमा हप्ता जमा न करणे किंवा कपात न करता केवळ पीक कर्जाची मजूरी / वितरण केल्यास संबंधित शेतकरी विमा जोखिमेच्या सरक्षणास पात्र होणार नाही.
  3. संबंधीत जिल्हाधिकारी यानी योजनेतील सहभागाच्या अंतिम तारखेनंतर 15 दिवसाच्या आत परंतु अधिसूचित पीक वेळापत्रकानुसार पिकाचे पेरणीच्या अंतिम तारखेच्या एक महिन्यापर्यंतच्या मर्यादेत सदर जोखमीबाबत अधिसुचना जाहीर करणे आवश्यक असेल. PM Pik Vima Yojana in Maharashtra
  4. संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्फत बाधित क्षेत्राचा अहवाल, अंदाजित पेरणी क्षेत्राचा अहवाल व अधिसुचना जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल.
  5. शासनाकडून विमा अनुदानाचा प्रथम हप्ता प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीमार्फत वरीलप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यात येईल. {PM Pik Vima Yojana in Maharashtra}
  6. सदर जोखमी अंतर्गत बाधित अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकाला नुकसान भरपाई देय झाल्यानंतर सदर पिकासाठी विमा संरक्षण संपुष्टात येईल व सदरचे अधिसुचित क्षेत्र / पीक हे हंगामाच्या शेवटी उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार नाही.

पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची सुचना विमा कपनी, संबधीत बँक, कृषि / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमाकाद्वारे देण्यात यावी. सर्वप्रथम केंद्रीय टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्यात यावा.

केंद्रीय टोल फ्री क्रमांक वरून सदर सूचना संबंधित विमा कंपनीस पुढील 48 तासात पाठवण्यात येईल. केंद्रीय टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक / कृषि व महसूल विभाग यांना दयावी तसेच सदर माहिती विमा कंपनीस तात्काळ देण्यात यावी, बँकेमार्फत विमा संरक्षित बाबी जसे पीक विमा सरक्षित रक्कम भरलेला विमा हप्ता व त्याचा दिनाक या बाबी तपासून सबंधीत विमा कंपनीस सर्वेक्षणाकरिता कार्यवाही सुरू करण्यासाठी पाठविल्या जातील. (\’PM Pik Vima Yojana in Maharashtra\’)

 नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज
  • आवश्यक त्या कागदपत्रासह
  • (7/12, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.)
  • विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. \”PM Pik Vima Yojana in Maharashtra\”

शेतकरी परिपुर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती 7 दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील.

पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोनवरील प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे देता येतील. याबरोबरच भारतीय हवामान विभागाचे अहवाल, प्रसार माध्यमातील बातम्या आदि तपशील सहपत्रित करता येईल.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | PM Pik Vima Yojana in Maharashtra”

Leave a comment