New Yojana For Construction Workers – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१ हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतदेह मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे.
तिसऱ्या निर्णयानुसार, बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रिम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
New Yojana For Construction Workers
मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मंडळाने जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना-
बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता इयत्ता 1 पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सहाय्य केले जाते.
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.
ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये त्या भागातील कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले जाते.
बांधकाम कामगारांना \’या\’ तीन नवीन योजनांचा लाभ मिळणार
- बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१००० रुपये अनुदान देण्यात येईल.
- जर बांधकाम कामगाराचा अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ करणार आहे.
- काम करत असतांना बांधकाम कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
वरील प्रमाणे या तीन नवीन योजनांचा लाभ आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे.दरम्यान, बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात.