महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना 2022 | MahaGramin Baliraja Taranhar Yojana (MBTY)

MahaGramin Baliraja Taranhar Yojana (MBTY):-महाराष्ट्र ग्रामीण बैंक मार्फत शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी आकर्षक व्याज सवलत योजना, महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना दि. १ जानेवारी रोजी बँकेचे अध्यक्ष मिलिंद पारड यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

गेली काही वर्षे दुष्काळ कोविड १९ संसर्ग , अतिवृष्टी गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जदाराला खाजगी सावकाराकडे जाण्याची वेळ येत आह अशा कठीण प्रसंगात बैंक अशा खातेदारासोबत उभी असून त्यांच्याकडील थकीत कर्जावर भरीव सूट देत त्यांचे कर्ज खाते बंद करण्याबाबतच्या सूचना ४१५ शाखांना दिल्या आहेत. ‘Maha Gramin Baliraja Taranhar Yojana’

MahaGramin Baliraja Taranhar Yojana (MBTY)

याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी कोविड १९ संसर्ग झालेल्या कर्जदारांना मानवीय दृष्टीकोनातून १० टक्के अधिकची व्याज सवलत देण्याबाबत बँकेच्या संचालक मंडळाने सुचविले आहे. या योजनेबाबत निर्णय घेताना बँकेच्या संचालक मंडळाने या योजनेचा जास्तीत जास्त थकीत कर्जदारांनी लाभ घेत ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे. कर्जदाराने त्यांचे थकीत कर्ज परतफेड केल्यावर त्याला लगेच बँके च्या नियमानुसार नवीन कर्ज दिले जाणार आहे. MAha Gramin Baliraja Taranhar Yojana

या योजनेच्या नावानुसारच थकीत कर्ज व्याजात घसघसीत सूट व पुन्हा कर्ज यामुळे नैसर्गिक आपत्तीत आलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने तारणहार होणार आहे. थकीत कर्जावरील व्याज सवलत ही बँकेच्या संचालक मंडळाने निश्चित केल्यानुसार थकीत व्याजाच्या ६० ते ७५ टक्के असणार आहे.

योजनेचे नावमहा-ग्रामीण बळीराजा तारणहार योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र ग्रामीण बँक
लाभार्थीराज्यातील शेतकरी आणि थकीत कर्जदार
उद्दिष्टशेतकऱ्यांना कर्ज मुक्त करणे
अर्ज प्रक्रियाबँक शाखे मध्ये भेटावे

या योजनेची अंमलबजावणी सूटसुटीत व्हावी, यासाठी बँकेने ऑनलाईन पोर्टल तयार केले असून कर्जदाराचे नाव व त्याला पात्र असलेली सवलत रकम या ऑनलाईन पोर्टलवरून शाखेतील अधिकारी सांगतील, तेच पोर्टल डाउनलोड करून या योजनेत सहभागी होत असल्याचा अर्ज शेतकरी सहीनिशी करू शकणार आहेत. सदरची योजना मर्यादितकालावधीसाठी असून 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंतच ही योजना लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त खातेदारांनी घ्यावा,असे आवाहन बँकेचे मुख्य सरव्यवस्थापकसंजय वाघ यांनी केले आहे.

दुष्काळ,अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे थकलेल्या कर्जाची परफेड करीत त्या खातेदारांना नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे
एक जानेवारी ते 31 मार्च दरम्यान महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना सुरु केली आहे. या माध्यमातून 60 ते 75 टक्के थकीत व्याजावर सवलत योजना मिळणार आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांतील 28 हजार सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात. MBTY

महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना 2022

यामुळे थकीत कर्ज असलेल्या सभासदांनी याचा लाभ घेतील, असा विश्वास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी शनिवारी (ता.१) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. श्री. घारड म्हणाले, की थकीत कर्जामुळे , बँकेच्या सभासदांचे खाते एनपीए होतात. यामुळे त्यांनी कर्ज घेण्यासाठी सावकराकडे जावे लागते.

अशा कठीण प्रसंगात बँक अशा खातेदारांसोबत उभी असून, त्यांच्याकडील थकीत कर्जावर भरीव सूट देत त्यांचे कर्ज खाते बंद करण्याबाबत सुचना बँकेने त्यांच्या राज्यातील ४१५ शाखांना दिल्या आहेत. कोरोनामुळे कर्जदारांना मानवी दृष्टीकोनातून १० टक्के अधिकची व्याज सवलत देण्याबाबत संचालक मंडळाने सुचविले. योजनेचे वैशिष्ट्य असे आहे की, कर्जदाराने त्यांचे थकीत कर्ज परतफेड केल्यानंतर लेगच बँकेच्या नियमानुसार नवीन कर्ज दिलेजाणार आहे.

बँकेचे सतरा जिल्ह्यात २८ हजार शेतकऱ्यांकडे ६०० कोटीची कृषी – थकबाकी आहे. यात मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात सर्वाधिक खातेदार आहेत. जिल्ह्यात ३५ शाखा आहेत. यामुळे या योजनेचा – लाभ घ्यावा असे आवाहनही बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी केले. पत्रकार परिषदेस बँकेचे सरव्यवस्थापक संजय वाघ, श्री. मुळे, आणि संतोष प्रभावती यांची उपस्थिती होती.

1 thought on “महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना 2022 | MahaGramin Baliraja Taranhar Yojana (MBTY)”

Leave a Comment

close button