लाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र | Ladli Laxmi Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

Ladli Laxmi Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladli Laxmi Yojana Maharashtra –  उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्देशासाठी संदर्भाधिन शासन निर्णयान्वये “सुकन्या योजना” दिनांक 01 जानेवारी, 2014 पासून लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नांवे रुपये 21,200/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर एकूण रुपये 1,00,000/- एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. Ladli Laxmi Yojana Maharashtra

Ladli Laxmi Yojana Maharashtra

“माझी कन्या भाग्यश्री”  या नवीन योजनेमध्ये सध्या सुरु असलेली “सुकन्या” ही योजना विलीन करुन व त्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना संपुर्ण राज्यात आली.

योजनेचे स्वरुप :- “माझी कन्या भाग्यश्री\” या योजनेमध्ये पुढीलप्रमाणे 2 प्रकारचे लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अनुज्ञेय राहतील.
प्रकार – 1 चे लाभार्थी एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. Ladli Laxmi Yojana Maharashtra

प्रकार – 2 चे लाभार्थी  एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

 1.  प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त वचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे रु.1 लाख अपघात विमा व रु.5,000/- पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल.
 2.  मुलीच्या नावावर शासनामार्फत एल.आय.सी. कडे रु.21,200/- चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु.१.०० लाख विम्याची रक्कम देण्यात येईल.
 3.  आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus Rs.21,200/-) नाममात्र रुपये 100/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल.

ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील –

 •  नैसर्गिक मृत्यू – 30,000/-
 • अपघातामुळे मृत्यू – 75,000/-
 •  दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास – 75,000/-
 •  एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास – 37,500/-
 • आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला रुपये 600/- इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल. \”Ladli Laxmi Yojana Maharashtra\”
योजनेचे नावलाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील मुली
उद्दिष्टबालिकेचा जन्मदर वाढविणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
वेबसाईटwww.maharashtra.gov.in

 या योजनेची उद्दिष्टे

 1. लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
 2. बालिकेचा जन्मदर वाढविणे.
 3. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे.
 4. बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहानाकरीता समाजात कायमस्वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे.
 5. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
 6. सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे. Ladli Laxmi Yojana Maharashtra
 7. जिल्हा, तालुका व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.

योजना राबविणारी यंत्रणा 

सदर योजना राबविण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरावर मार्गदर्शन व सनियंत्रण करण्यासाठी एक सुकाणु समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीची 4 महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात यावी. \’Ladli Laxmi Yojana Maharashtra\’

 योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती

सुकन्या” योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेत करण्यात आल्यामुळे “सुकन्या” योजनेच्या सर्व अटी व शर्ती “माझी कन्या भाग्यश्री\’ योजनेमध्ये लागू करण्यात येत आहे. तसेच “सुकन्या” योजनेतील मुलींना “माझी कन्या भाग्यश्री\” या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.

 1.  सदर योजना सर्व गटातील
 2. (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्ड धारक) कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
 3. सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 4. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 5. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील. तसेच तिने इयत्ता 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील. Ladli Laxmi Yojana Maharashtra
 6. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली प्रकार-२ प्रमाणे योजनेस पात्र असतील.
 7. एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय 0 ते 6 वर्ष (6 किंवा 6 वर्षापेक्षा कमी) इतके असावे.
 8. बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.
 9. प्रकार-१ च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार-2 च्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 10. सदर योजनेअंतर्गत 18 वर्षानंतर एल.आय.सी. कडून जे रु.1,00,000/- मिळणार आहेत. त्यापैकी किमान रु.10,000/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरुन संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल.
 11. सदर योजनेच्या टप्पा-2, टप्पा-3 व टप्पा-4 मध्ये नमूद केलेले लाभ लाभार्थीस पोषण आहार तथा वस्तु स्वरुपात देय राहतील.
 12. ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील. Ladli Laxmi Yojana Maharashtra

 

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

बांधकाम कामगार 5,000 रु. योजना अर्ज | Bandhkam Kamgar Yojana 2024

लखपती दीदी महिला लखपती होणार, करा अर्ज : Lakhpati Didi Yojana Maharashtra

मुलांना महिन्याला 2,250 रु. मिळतात करा अर्ज : Bal Sangopan Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाहाला 2.5 लाख रुपये मिळतात करा अर्ज : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

Leave a comment