वर्षाला १२,००० रुपये Namo Kisan Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो , आज आपण पहा अखेर जीआर आला वर्षाला १२,००० रु मिळणार (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Maharashtra ) या विषयीचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात , कशा पद्धतीने आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य , काय लागणार आहे , कागदपत्रे , अर्ज कसा भरायचा , कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Namo Shetkari Yojana Maharashtra

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी \”नमो शेतकरी महासन्मान निधी\” ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM KISAN ) योजनेच्या धर्तीवर \”नमो शेतकरी महासन्मान निधी\”
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Maharashtra ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि.३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.म्हणजेच वार्षिक १२००० रुपये शेतकऱ्यांना पर चार महिन्यांमध्ये ४००० रुपये याप्रमाणे दिले जाणार आहे
वर्षला राज्य सरकार ६९५८ कोटी रुपये या योजनेसाठी देणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना आता वार्षिक १२००० रुपये १०० टक्के अनुदानावरती मिळणार आहे.   त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

नमो शेतकरी योजना शासन निर्णय

सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी \”नमो शेतकरी महासन्मान निधी\” (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Maharashtra ) ही योजना सन २०२३-२४ पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१. सदर योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील :-
सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात. ॥ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषामध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
पी. एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
२. योजनेची कार्यपद्धती:-
पी. एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरून / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.
३. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली:-
 1. 1पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Maharashtra )
 2. राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल / प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
 3. केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल / प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.
निधी वितरणाची कार्यपध्दती:-
\”नमो शेतकरी महासन्मान निधी योजना\” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.

नमो शेतकरी योजनेसाठी बंधनकारक आहेत खालील गोष्टी :

 • १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीच्या जमीनधारक शेतकरी पात्र.
 • सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना इ केवायसी करावी लागेल.
 • बँक खात्यास आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल.
 • लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती देणं बंधनकारक राहील.

या योजनेअंतर्गत सन्माननिधी शेतकऱ्यांना किती मिळणार ?

 • प्रत्येक शेतकरी माघे प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
 • केंद्र सरकारचे ६ हजार आणि राज्य सरकार कडून ६ हजार असे मिळून १२००० अतिरिक्त रुपये मदत म्हणून प्रतिवर्षी शेतकऱ्यांना मिळणार.
 • ११५ कोटी शेतकरी कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana Documents लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :

 1. पासपोर्ट साईझ फोटो
 2. मोबाईल नंबर
 3. ओळखपत्र
 4. आधार कार्ड
 5. मतदान कार्ड
 6. बँक खाते क्रमांक
 7. जमिनीची कागदपत्रे [ सात बारा ]
 8. पत्त्याचा दाखला
 9. मतदान कार्ड
Namo Shetkari Yojana Conclusion :
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही जीआर आला असून वर्षाला १२,००० रुपये मिळणार Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana या योजनेबद्दल माहीति दिली आहे जसे कि , त्याच थोडक्यात माहीति , ती योजना म्हणजे काय, कागदपत्रे कोणती लागतील , अर्ज कसा करावा इत्यादी मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल . धन्यवाद !!

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.