Kharip Pik Vima Manjur: मित्रांनो, यावर्षी खरीप हंगाम 2024 मध्ये हंगामाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे पीक विमा धारक शेतकर्यांना पीक विमा (Kharip Pik Vima Manjur) मिळेल अशी आशा होती.
पण बरेच दिवस उलटूनही शेतकर्यांना पीक विमा मिळाला नाही. अशातच आता एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामध्ये खरीप पीक विमा 2024 करिता 724 कोटींपेक्षा जास्त निधी वितरीत करण्यास मंजूरी {Kharip Pik Vima Manjur} देण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकर्यांना पीक विमा मिळण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. तर शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहुयात आजच्या ह्या लेखात.
Kharip Pik Vima Manjur
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2024 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबतचा (Kharip Pik Vima Manjur) अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.
724 कोटींचा पीक विमा निधी कंपन्यांना मिळणार
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 व रब्बी हंगाम 2024-24 शासन निर्णय दि.01/07/2024 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.
📢 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू 👉 येथे पहा सविस्तर माहिती
भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 724,51,46,809/- (अक्षरी सातशे चोवीस कोटी एक्यावन्न लक्ष सेचाळीस हजार आठशे नऊ रुपये) इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत (Kharip Pik Vima Manjur) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय काय आहे चला पाहुयात.
शासन निर्णय
भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- (अक्षरी सातशे चोवीस कोटी एक्यावन्न लक्ष सेचाळीस हजार आठशे नऊ रुपये) इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम 2024 करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.
📃 सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
उर्वरित पीक विमा मिळण्याची शक्यता
मित्रांनो, याआधी काही प्रमाणात शेतकर्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळाला आहे, परंतु अजूनही बरेच शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे ह्या शासन निर्णयामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, उर्वरित पीक विमा हा मिळू शकतो.
तर अशाप्रकारे अतिशय महत्त्वाचे असे हे अपडेट आपण आज जाणून घेतले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.