नमस्कार मित्रांनो, आज आपण १० वी पास विद्यार्थ्यांना महिना ३,००० रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप (Kotak Mahindra Scholarship) या योजनेबद्दल / स्कॉलरशिप बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा / स्कॉलरशिप चा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे १० वी पास विद्यार्थ्यांना महिना ३,००० रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप आणि त्यासाठी काय लागणार आहे, कागदपत्रे, अटी, नियम आणि कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Kotak Mahindra Scholarship 2024
आता काही दिवसांपूर्वी दहावी इयत्तेचा निकाल लागला .दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या स्कॉलरशिप ची संधी निघाली असून, आपण ती स्कॉलरशिप नक्की काय आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. ही स्कॉलरशीप कोटक महिंद्रा Kotak Mahindra Scholarship या कंपनीची आहे. कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती हा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक महिंद्रा समूहाच्या कंपन्यांचा एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), कोटक महिंद्रा ग्रुपची CSR अंमलबजावणी करणारी एजन्सी यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामधील स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती 2024 चे तपशील पात्रता निकष :-
- अर्जदारांनी 2024 मध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षे [एसएससी (SSC)/सीबीएसई (CBSE)/आयसीएसई (ICSE)]मध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदारांनी मुंबई महानगर प्रदेशातील, मुंबईतील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखांसाठी, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळवलेला असावा.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2024 असा करा ऑनलाईन अर्ज Mahajyoti Free Tablet Yojana Registration
पुरस्कार आणि पारितोषिके : प्रति महिना 3,000 रुपयांची शिष्यवृत्ती
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा कमी
- मुंबई महानगर प्रदेश (MMR) येथील मुलं या > स्कॉलरशीपसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30-06-2023
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज करु शकता
आवेदन करण्यासाठी लिंक : www.b4s.in/mhcr/KJSP1
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्या साठी वेबसाईट –
https://kotakeducation.org/kotak-junior- scholarship/
शिष्यवृत्तीची वैशिष्ट्ये
इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल. शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या ऍक्टिव्हिटी जसे की वन-टू-वन मार्गदर्शन, शैक्षणिक समर्थन, करिअर मार्गदर्शन सत्र, प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी समर्थन, एक्सपोजर व्हिझिट्स आणि होम व्हिझिट्स करण्यात येतील.
कोटक एज्युकेशन फाउंडेशन बद्दल जाणून घेऊ | Kotak Mahindra Scholarship
कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे उद्दिष्ट : शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक शिक्षण यासारख्या विविध शिक्षण-आधारित हस्तक्षेपांद्वारे वंचित कुटुंबातील मुले आणि तरुणांना आधार देणे हे कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे
ह्यामुळे ते दारिद्र्यरेषेच्या वर जाऊ शकतील आणि शाश्वत प्रक्रियेद्वारे सन्मानाचे जीवन जगू शकतील. २००७ मध्ये नोंदणीकृत, कोटक एज्युकेशन फाउंडेशनने मुंबई आणि जवळपासच्या उपनगरातील सुमारे २०० शाळांना भागीदारी आणि समर्थन दिले आहे आणि सुमारे १ लाख अधिक विद्यार्थी, सुमारे १००० शाळाप्रमुख, १० हजार शिक्षक आणि सुमारे ३०००० अधिक शाळा पालकांना प्रभावित केले आहे. Kotak Mahindra Scholarship कोटक एज्युकेशन फाउंडेशन कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभियंता, डॉक्टर आणि आर्थिक व्यावसायिक बनण्यास मदत करण्यात यशस्वी झाले आहे. सध्या, कोटक एज्युकेशन फाउंडेशन मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे आणि पुणे येथे शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण प्रकल्पांसाठी काम करत आहे आणि शिष्यवृत्ती प्रकल्पासाठी आणि कोविड मुळे नकारात्मक परिणाम झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत यासाठी भारतभर त्यांची उपस्थिती आहे.
१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र Lek Ladki Yojana Maharashtra 2024
Conclusion
मित्रांनो, ह्या लेख मध्ये आम्ही १० वी पास विद्यार्थ्यांना महिना ३,००० रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप (Kotak Mahindra Scholarship) या योजनेबद्दल / स्कॉलरशिपबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय, पात्रता, अटी नियम, अर्ज, कसा करावा इत्यादी मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.
धन्यवाद !!