ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नोकरी, केंद्र सरकारची योजना | Jobs for Senior Citizen

By Shubham Pawar

Published on:

Jobs for Senior Citizen: देशातील 60 वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने नोकरी मिळवून देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या वतीने काल 1 ऑक्टोबरपासून एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. नोकरीची आवश्यकता असलेले ज्येष्ठ नागरिक या पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करू शकतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा नोकरी करण्याची गरज असते. मात्र, आयुष्याच्या संध्यापर्वात आपल्याला नोकरी कोण देणार, अशीही चिंता त्यांना भेडसावत असते. ही समस्या लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय खात्याने अशा नागरिकांना सन्मानाने पुन्हा नोकरी मिळावी यासाठी एक पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या खात्याचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, नोकरीची गरज असणारे ज्येष्ठ नागरिक व नोकरी देणारे यांना या पोर्टलच्या माध्यमातून परस्परांशी ऑनलाइन संपर्क साधता येईल.

ज्येष्ठ नागरिकांना नोकरी कशा प्रकारे मिळेल

ज्येष्ठ नागरिकांना पोर्टलवर जाऊन आधी नाव नोंदवावे लागेल. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत त्यांना व्हर्च्युअल इंटरव्ह्यू देता येतील.

क्षमता आणि पात्रतेनुसार त्यांना खासगी कंपन्या नोकऱ्या देतील. ज्येष्ठांना नोकऱ्या द्या, असे आवाहन करणारे पत्र सीआयआय, फिक्की, असोचॅम या उद्योजक संघटनांना सरकारने पाठवले आहे.

त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 या नंबरवर टोल फ्री हेल्पलाईन देखील सुरू करण्यात येणार आहे. सरकारच्या या नव्या उपक्रमाचं ज्येष्ठ नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. \’Employment Exchange For Senior Citizen\’

Senior Citizen Job

1951 साली 2 कोटी ज्येष्ठ‌ नागरिक होते. 2001 साली ही संख्या 7.6 कोटींवर पोहोचली. 2011 साली देशात 10.4 कोटी ज्येष्ठ नागरिक होते.

या ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेकांना पुन्हा नोकरी करण्याची गरज असल्याने त्यांना ती संधी मिळवून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

ज्येष्ठ नागरिकांना नोकरी साठी पोर्टल सुरू केले आहे त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ज्येष्ठ नागरिकांना नोकरी मिळेल. तसेच केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन देखील सुरू केलेला आहे जे की आपणांस सांगितलेला आहे.

नांव नोंदणी अशा प्रकारे करता येणार

 • ज्येष्ठ नागरिकांना नोकरी मिळवून देण्याच्या पोर्टलवर संबंधित व्यक्तीने आपले शिक्षण, विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य, कामाचा अनुभव अशी सर्व माहिती नावनोंदणी करताना भरायची आहे.
 • नोकरी देणारे ही माहिती वाचतील व त्यांना योग्य वाटलेल्या व्यक्तीशी संपर्क साधतील.
 • या पोर्टलवर नावनोंदणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
 • देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना नोकरी मिळवण्यासाठी पोर्टलवर अशा प्रकारे नाव नोंदणी करता येईल. आपणांस काही अडचण आल्यास तुम्ही टोल फ्री हेल्पलाईन नंबरला (14567) कॉल करू शकता. Job for Senior Citizen

योजनेचा उद्देश

 1. ज्येष्ठ नागरिकाला नोकरीची आवश्यकता असते.
 2. ज्येष्ठ नागरिक परिवारासाठी आर्थिक मदत करू शकेल.
 3. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमुळे एक नवीन जिद्द निर्माण होईल.
 4. ज्येष्ठ नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून.
 5. नोकरी संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना भरपूर अडचणी येतात त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली.
 6. ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीनुसार व कौशल्य नुसार नोकरी मिळेल.
 7. ज्येष्ठ नागरिक पोर्टल मध्ये आपल्या मनाने पर्याय निवडू शकतात.
 8. नांव नोंदणी करताना काही अडचण आल्यास टोल फ्री हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकतात.
 9. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सोयिस्कर तसेच सोपे होईल. Senior Citizen Job Portal 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नोकरी, केंद्र सरकारची योजना | Jobs for Senior Citizen”

Leave a comment