Janani Suraksha Yojana in Marathi – शासन परिपञक क्रमांक जेएसवाय/2006/प्र.क्र.175/ कु.क.3 दि. 22 डिसेंबर 2006 नुसार जननी सुरक्षा योजना राबविली जाते. या योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
केंद्रशासनाच्या परिपञकानुसार दिनांक 8 मे 2013 पासून लाभार्थ्यांचे वय व अपत्यासंबंधीच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
Janani Suraksha Yojana
उद्दिष्टे –
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांचे आरोग्य संस्थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
अंमलबजावणी पध्दत
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसुचित जाती व जमाती या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना शासकीय व खाजगी मानंकित आरोग्य संस्थेतील कोणत्याही बाळंतपणानंतर लाभ देय आहे तर फक्त दारिद्रयरेषेखालील गरोदर महिलेला घरी बाळंतपणानंतर लाभ देय आहे.
- लाभार्थीकडून जननी सुरक्षा योजनेकरिता आवश्यक असलेली कागदपञे प्राप्त करुन घेणे.
- विहीत नमुन्यातील जेएसवाय कार्ड सर्व आवश्यक माहिती भरुन लाभार्थीस देणे.
- पाञ लाभार्थीस प्रसुतीपूर्व तीन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्त गोळया मिळवून देणे अथवा त्याकरिता मदत करणे.
- पाञ जेएसवाय लाभार्थीस शासकीय आरोग्य संस्थ्ोत किंवा शासन मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती करिता प्रवृत्त करणे.
- पाञ जेएसवाय लाभार्थीस बॅंकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे {Janani Suraksha Yojana in Marathi}
जननी सुरक्षा योजना
लाभार्थ्यास दिले जाणारे लाभ
ग्रामीण भागातील जे एस वाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खाजगी आरोग्य संस्थ्ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत रुपये 700/- लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़-या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो. (Janani Suraksha Yojana in Marathi)
शहरी भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खाजगीआरोग्य संस्थ्ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत रुपये 600/-लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़-या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसुती घरी झाल्यास अशा लाभार्थ्यांस रुपये 500/- लाभ प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
जेएसवाय पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्ञक्रिया करणे आवश्यक असल्यास लाभार्थीस रुपये 1500/- लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो. \”Janani Suraksha Yojana in Marathi\”
Janani Suraksha Yojana
आशा कार्यकर्तीस मिळणारे लाभ
ग्रामीण भागातील पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये 600/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यात येते. त्यामधील रुपये 300/- प्रसूती पूर्व दयावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यावर आणि रुपये 300/- आरोग्य संस्थ्ेात प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते. [Janani Suraksha Yojana in Marathi]
शहरी भागात पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये 400/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यात येते. त्यामधील रुपये 200/- प्रसूती पूर्व दयावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यावर आणि रुपये 200/- आरोग्य संस्थ्ेात प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्ञी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.
शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेञतील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे व त्यांच्याकडील इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये.
बिगर शासकिय संस्थांचे कार्य खाजगी रुग्णालये सुध्दा जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जसुयो पाञ लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मानांकित करण्यात आलेले आहेत. \”Janani Suraksha Yojana in Marathi\”
Scheme money does not reach common people.