मुलींना मिळणार मोफत शिक्षण : Free Education For Girl in Maharashtra 2024

By Shubham Pawar

Updated on:

Free Education For Girl In Maharashtra 2024 – नमस्कार मित्रांनो, नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उ‌द्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला, आणि महत्वपूर्ण घोषणा केली ती म्हणजे आता मुलींना मिळणार मोफत शिक्षण.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला mulina mofat shikshan या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील? याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

Free Education For Girl In Maharashtra 2024

राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उ‌द्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात मांडावेत, असे आवाहन केले. जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्यांने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळण्याची मागणी केली.

मुलींना मोफत शिक्षण

योजनेचे नाव मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४
विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग
राज्य महाराष्ट्र
लाभ मोफत शिक्षण
वर्ष 2024-25

 

पाटील यांनी जून 2024 पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही mulina mofat shikshan. जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली.

 

Free Education For Girl In Maharashtra Eligibility

  • महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग अश्या कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरवी लागणार नाही.
  • महाराष्ट्रातल्या मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही.
  • मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग पॉलीटेक्निक अश्या ८००  कोर्सेस ला फी भरावे लागणर नाही.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा कमी असावे
  • फक्त  महाराष्ट्रातील मुली या फ्री शिक्षणासाठी पात्र असतील

Free Education For Girl In Maharashtra Documents List

ही कागदपत्रे लागू शकतील

  1. आधार कार्ड
  2. उत्पन्न प्रमाणपत्र (दाखला)
  3. डोमासाइल प्रमाणपत्र
  4. शाळा सोडल्याचा दाखला
  5. मार्कशीट
  6. पासपोर्ट साईज फोटो

Conclusion

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही मुलींना मोफत शिक्षण या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की योजना काय होती, कोण लाभ घेऊ शकतो,  मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद

 

मोफत शिक्षण योजना मुलांना लागू आहे का?

फक्त मुलींसाठी फ्री शिक्षण योजना लागू आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे लागते?

मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत मध्ये असावे.

फ्री एज्युकेशन योजनेचा भारतातील सर्व मुली लाभ घेऊ शकतात का?

नाही, फक्त महाराष्ट्रातील मुलींसाठी फ्री एज्युकेशन मिळणार आहे.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.