फळपीक विमा नोंदणीला सुरुवात अशी करा नोंदणी | Fal Pik Vima Yojana 2024

By Shubham Pawar

Published on:

Fal Pik Vima Yojana 2024 : राज्यात आंबिया बहरासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल.

त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बार्बीचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.

 

फळपीक विमा योजना 2024

पुनर्रचित हवामान अवकाळी पाऊस, जादा तापमान, अति पाऊस किंवा गारपिट पासून फळ पिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील.

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठी देखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल.

एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो. त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जाते. मात्र, असा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमा हप्ता भरावा लागणार आहे. \’Fal Pik Vima Yojana 2024\’

 

आवश्यक कागदपत्रे व नोंदणी कशी करावी

बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास ही कागदपत्रे गोळा करावी.

  • आधार ओळखपत्र
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र
  • फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र
  • ब‌ँकेचे खातेपुस्तक

अशी कागदपत्रे व माहिती गोळा करावी.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा गावातील सीएससी (CSC) सेंटरवर उपलब्ध आहे.

नोट: कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना ऐच्छिक असेल.

नोंदणी प्रक्रिया

केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. तसेच विविध प्रकारची ई-सेवा केंद्रे, बँकांमार्फत देखील सहभाग नोंदवता येईल. कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे, कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. Fal Pik Vima Yojana Maharashtra Online Form

 

फळपीक विमा योजना उद्देश

साधारपणे फळपीक विमा योजनेचे उद्देश आहे.

  1. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  2. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  3. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  4. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे.
  5. शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
  6. शेतकऱ्यांना आर्थिक रित्या मदत होते तसेच पुढील पिक, घेण्यासाठी मदत होते. Fal Pik Vima 2024

फळपीक विमा असा भरा ऑनलाईन 👇👇

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment