Ek Gav Ek Vaan Anudan Yojana – दीडशे गावांची झाली निवड शेतकऱ्यांना हेक्टरी 7 हजार 500 रुपयांचे अनुदान. कृषी खात्याने या वर्षीपासून एकात्मिक सोयाबीन व कापूस प्रकल्प अंतर्गत एक गाव, एक वाण ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 7 हजार 500 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने दीडशे गावांची निवड केली असून, आतापर्यंत पाच हजार हेक्टरवर एका साडेसात हजार रुपयांचे अनुदान.
Ek Gav Ek Vaan Anudan Yojana
या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणासोबतच प्रति हेक्टरी 7 हजार 500 रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात दर्जेदार व लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य व प्रोत्साहन दिले जाणार आहे.
तसेच सोयाबीन उत्पादनासाठीही अधिक वाव मिळावा, यासाठी या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या वतीने कार्यरत करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. “Ek Gav Ek Vaan Anudan Yojana”
त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
दर्जेदार उत्पादनासाठी निवड Ek Gav Ek Vaan Anudan Yojana
परभणी जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पिकासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत कापसाचे उत्पादकता, उत्पादन वाढत असून कापसाचा दर्जा व सोयाबीनचा दर्जा उंचविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.
यातून शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागामार्फत ठेवण्यात आले आहे.
साडेसात हजार रुपयांचे अनुदान
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 7500 रुपयांचे अनुदान दिले जाते. यामध्ये बियाणे, पिकाला लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, कीड व रोगाच्या व्यवस्थापनावर हे अनुदान खर्च करणे अनिवार्य असते.
यासाठी कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना 7500 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. Ek Gav Ek Vaan Anudan Yojana
अशी केली जाते शेतकऱ्यांची निवड
निवड झालेल्या गावामधील शेतकऱ्यांचीच महाडीबीटी पोर्टलवरील अर्जाद्वारे या प्रकल्पासाठी निवड केली जाते.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना कीट दिली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांची मूल्य साखळी विकास कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
अशी केली जाते गावाची निवड
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात येतात. ज्या गावांमधील सर्वाधिक अर्ज शेतकऱ्यांचे प्राप्त होतात, त्या गावाची एक गाव, एक वाण या योजनेसाठी निवड केली जाते.