Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2024 – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज येथे करा अर्ज.
Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2024
नवे शैक्षणिक वर्ष 2024 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे.
- या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.
- अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. \”Add Focus Keyword to your SEO Meta Description 2024\”
- आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 16 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपेक्षा कमी असावी. (Maulana Azad Education Loan Scheme 2024)
राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 18 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. [Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme
दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त 3 टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज येथे करा अर्ज
योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल.
राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा 022-22657982 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. {Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2024}
Maulana Azad Karj Yojana Maharashtra पात्रता :
अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी किंवा पदविकेसाठी प्रवेश घेतलेला असावा. लाभार्थी महाराष्ट्र राज्या रहिवाशी असावा.
वयोमर्यादा-अर्जदाराचे वय 16 ते 32 वर्ष दरम्यान असावे. अर्जदार शिकत असलेल्या कॉलेज / संस्थेस राज्य शासन /AICT / इ. ची मान्यता असणे आवश्यक आहे. \”Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2024\”
अर्जदाराच्या पालकांचे कौटुम्बिक वार्षिक उत्पन्न रु 2,50,000/- पेक्षा कमी असावे. शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती महामंडळांच्या संकेत स्थळांवर उपलब्ध आहे.
या कालावधीत परतफेड करावी सूरु होण्याचा अवधी – अभ्यासक्रम पूर्ण झाल्यांतर सहा महिन्यानंतर किंवा नोकरी लागल्या पासून परतफेड सुरु होईल.