Certificates On Your WhatsApp: आता दाखले मिळणार तुमच्या व्हॉट्सॲप वर

By Shubham Pawar

Published on:

Certificates On Your WhatsApp
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Certificates On Your WhatsApp – ऑनलाइन सेवा : पुणे महापालिकेकडून नागरिकांसाठी सुविधा. दाखले मिळणार \’व्हॉट्सअॅप\’वर, पुणे महापालिकेकडून नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, आता संकेतस्थळावर जाऊन किंवा अॅप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही.

Certificates On Your WhatsApp

8888251001 हा मोबाईल क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि मेसेज टाकून तुम्हाला हव्या असलेल्या दाखल्याची सॉफ्ट कॉपी मिळवता येणार आहे. पहिल्या टप्प्यात बुधवारपासून (ता. 7) मिळकतकरासंदर्भातील सेवा सुरू केली आहे. पुढील काळात जन्म-मृत्यू दाखला, पाळीव प्राणी दाखला यासह इतर सेवा दिल्या जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संगणक विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, साहाय्यक आयुक्त राहुल जगताप उपस्थित होते. (Certificates On Your WhatsApp)

सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले लगेच देणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना संकेतस्थळ वापरता येत नाही, तसेच संकेतस्थळावर गेले, तर संबंधित विभाग निवडून त्याची प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे हे दाखले घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. आता ही दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी \’व्हॉट्सअॅप बॉट\’ ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. बिनवडे म्हणाले, \”नागरिकांना सहजतेने सर्वप्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी महापालिकेने व्हॉट्सअँप बॉट\’ ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकतकरासंदर्भातील दाखले, पावती व इतर सुविधा उपलब्ध आहे.

मिळकतकर विभागाकडे नागरिकांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास किंवा प्रॉपर्टी क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होईल. तसेच, यावरूनलगेच संकेतस्थळावर जाऊन बिलदेखील भरता येणार आहे.\’ उपायुक्त पाटील म्हणाल्या, \”सध्या केवळ व्हॉट्सअँप बॉट वर मिळकतकर विभागाची सेवा उपलब्ध होत असली, तरी पुढच्या टप्प्यात पाणीपट्टी, जन्म मृत्यू दाखला, बांधकाम दाखला, पाळीव प्राणी दाखला यासह इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहे.

एका व्यवहारासाठी 50 पैसे शुल्क

महापालिकेने यासाठी थेट व्हॉट्सअॅपच्या मेटा कंपनीशी करार केला आहे. दाखल्याची माहिती घेणे, ती तपासून दाखला मिळवणे ही सर्व प्रक्रिया 24 तासांत पार पाडली गेली, तर महापालिकेकडून प्रति व्यवहार 50 पैसे इतके शुल्क व्हॉट्सअॅप घेणार आहे. यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे बिनवडेयांनी सांगितले. {Certificates On Your WhatsApp}

2019 पूर्वीचे दाखले मिळणार

जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी 2019 नंतर केंद्र सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमचे (सीआरएस) सॉफ्टवेअर वापरले जात आहे. त्यामुळे 2019 नंतरच्या जन्म व मृत्यू दाखल्यांची माहिती महापालिकेच्या सर्व्हरवर उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप क्रमांकावर 2019 पूर्वीचेच जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध होणार आहेत.

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

बांधकाम कामगार 5,000 रु. योजना अर्ज | Bandhkam Kamgar Yojana 2024

लखपती दीदी महिला लखपती होणार, करा अर्ज : Lakhpati Didi Yojana Maharashtra

मुलांना महिन्याला 2,250 रु. मिळतात करा अर्ज : Bal Sangopan Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाहाला 2.5 लाख रुपये मिळतात करा अर्ज : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

0 thoughts on “Certificates On Your WhatsApp: आता दाखले मिळणार तुमच्या व्हॉट्सॲप वर”

Leave a comment