Anandacha Shida Gudi Padwa :- नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घोषित केला. याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. ही पोस्ट शेवटपर्यंत पाहा. आपल्या मित्रांना ही महत्वपूर्ण माहिती शेअर करा.
Anandacha Shida Gudi Padwa
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (Anandacha Shida Gudi Padwa एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता सन 2022 च्या दिवाळी, सन 2023 च्या गुढीपाडवा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. गौरी-गणपती उत्सव, दिवाळी सणांनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) ₹100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत राज्यात श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा-छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” चे वितरण सुरू आहे. त्याचधर्तीवर दि.14-02-2024 रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, उपरोक्त पात्र शिधापत्रिकाधारकांना सन 2024 च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” ई-पॉस प्रणालीद्वारे ₹ 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
आनंदाचा शिधा गुढीपाडवा
शासन निर्णय Anandacha Shida Gudi Padwa
- लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण 1.69,24,637शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणंनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” खरेदी करण्याकरीता Mahatenders या ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
- सदर “आनंदाचा शिधा” शिधाजिन्नस संच खरेदी करण्याकरीता निविदा प्रक्रियेअंती गुनिना कमर्शिअल्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या न्यूनतम दराने उपरोक्त शिधाजिन्नस संच खरेदी करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
- माहे मार्च, 2024 मध्ये लागू होणारी आचार संहिता विचारात घेता, सदर आचार संहितेच्या कालावधीमध्ये प्रस्तावित 4 शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका 1 याप्रमाणे ई-पॉसद्वारे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ₹100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने उपरोक्त सणांकरीता वितरीत करण्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दि.28-02-2024 च्या शासन परिपत्रकान्वये गठीत छाननी समितीची शिफारस व त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.
- सदर “आनंदाचा शिधा” शिधाजिन्नस संच खरेदी करण्याकरीता निविदा प्रक्रियेअंती प्राप्त झालेल्या दरानुसार (₹314/- प्रतिसंच) खरेदी खर्च 1531.43 कोटी व इतर अनुषंगिक खर्च 119.14 कोटी यासह एकूण 1550.57 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे.
- उपरोक्त प्रयोजनासाठी येणारा खर्च सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Conclusion Anandacha Shida Gudi Padwa
राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय Anandacha Shida Gudi Padwa
> या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार.
> राज्यातील सुमारे २५ लक्ष अंत्योदय अन्न योजना, १.३७ कोटी प्राधान्य कुटुंब व ७.५ लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे १.६९ कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येईल
> यासाठी ५५० कोटी ५७ लाख रुपये इतक्या खर्चास मंजूरी
मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही राज्य शासनाने गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ Anandacha Shida Gudi Padwa देण्याचा निर्णय घोषित केला आहे. नेमका निर्णय काय आहे या विषयी माहिती देण्यात आली आहे. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.
धन्यवाद !