अहिल्या शेळी योजना, 90% अनुदानावर १० शेळी १ बोकड अर्ज सुरू | Ahilya Sheli Yojana 2024

By Shubham Pawar

Published on:

Ahilya Sheli Yojana 2024– राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहिल्या शेळी योजना

या योजने अंतर्गत राज्यातील वय 18 ते 60 वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषे खालील, अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक), अश्या लाभार्थ्या कडून दि. 10/12/2022 ते दि. 25/12/2022 अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

योजनेची पूर्ण माहिती / अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे . ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून AhilyaYojana App व्दारे वरील दिलेल्या तारखां मधेच करण्यात यावे.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. \”Ahilya Sheli Yojana 2024\”

अहिल्या शेळी योजनेचे ठळक वैशिष्ठे

  • राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी. योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
  • उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल
  • एकूण रक्कम रु 66000/-
  • लाभार्थी साठी 90% शासन हिस्सा ( रु 59,400/-) व 10% लाभार्थी हिस्सा (रु, 6600/-)

अहिल्या शेळी योजना पात्रता

  • अनुसूचित जाती जमाती साठी दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी
  • अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक)
  • महिलां लाभार्थीनाच प्राधान्य
  • लाभधारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. Ahilya Sheli Yojana
  • पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
  • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा. {Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022}

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती

  •  अर्ज सादर करण्याचा कालावधी 10/12/2022 ते 25/12/2022 पर्यंत
  • योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून Ahilya Yojana App व्दारे करण्यात यावे
  • अधिक माहिती साठी संकेतस्थळ वर भेट घ्या www.mahamesh.co.in

Ahilya Sheli Yojana Required Upload Document

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा)
  • रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 3 मध्येच सादर करावयाचा आहे). 1 मे 2001 नंतर तिसरे हयात अपत्य नसावे. Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022
  • अर्जदाराचे शेतजमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील 7/12 उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा 7/12 उतारा व 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 4 मध्येच सादर करावयाचा आहे). or भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत (रु. 100/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 5 मध्येच सादर करावयाचा आहे).
  • अपंगत्व प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • स्वयंमघोषणा पत्र ( बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • बीपीएल कार्ड
  • बँक पासबुक ची झेरॉक्स [Ahilya Sheli Yojana 2022]
बंधपत्र नमुने Download Formats
बंधपत्र नमुने  
बंधपत्र नमूना क्रमांक – १ – प्रमाणपत्र
बंधपत्र नमूना क्रमांक – २ – रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकारी यांचा)
बंधपत्र नमूना क्रमांक – ३ – अपत्य दाखला / प्रमाणपत्र
बंधपत्र नमूना क्रमांक – ४ – अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीकडून रु. १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावयाच्या संमतीपत्राचा मसुदा – “संमती पत्र”
बंधपत्र नमूना क्रमांक – ५ – भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराचा मसुदा (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) – “भाडे करार”
बंधपत्र नमूना क्रमांक – ६ – “स्वयंमघोषणा पत्र”
 

Ahilya Sheli Yojana Helpline

  • Phone Number – 020-25657112
  • Email – mdsagpune@gmail.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील Video पहा 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

1 thought on “अहिल्या शेळी योजना, 90% अनुदानावर १० शेळी १ बोकड अर्ज सुरू | Ahilya Sheli Yojana 2024”

Leave a comment