Anna Bhau Sathe Student Yojana:-आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून हीअर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 20 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यास गुणानुक्रमे रू. 3000/- अर्थसहाय्य देण्यात येईल.
आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी \”लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना\” सुरू केलेली आहे.
Anna Bhau Sathe Student Yojana
नियम व अटी
१. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त २० व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमास जास्तीत जास्त १० विद्यार्थी सदर योजनेसाठी पात्र राहतील.
२. पात्र विद्यार्थ्यास पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रू. ३,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
३. विद्यार्थ्याच्या पालकांचे (कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक एकत्रित) उत्पन्न रू. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला
आवश्यक राहील. विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान ६५ टक्के गुण संपादित केलेले असावेत.
४ . महाविद्यालय/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
५ . विद्यार्थ्याची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील, विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
६ . विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही. विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
७. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा सांक्षाकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
८. विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता,खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड).
९. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत
१०. सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थ्यास संपूर्ण अभ्यासक्रमात एकदाच देण्यात येईल.
११. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील
Apply Here – https://bcud.unipune.ac.in/Scholorships
Loan Yojana