Shabdanchya Jati in Marathi : प्रथम आपण शब्द म्हणजे काय शब्द कशाला म्हणतात ते समजून घेऊया, शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहेत कोणत्याही अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात.
शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत या जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजे त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत असतो. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजे त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होऊ शकत नाही. विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे आपण म्हणतो.
मराठीतल शब्दांच्या आठ जाती पुढीलप्रमाणे आहेत
- नाम (Noun)
- सर्वनाम (Pronoun)
- विशेषण (Adjective)
- क्रियापद (Verb)
- क्रियाविशेषण (Adverb)
- उभयान्वयी अव्यय (Conjunction)
- शब्दयोगी अव्यय (Preposition)
- केवलप्रयोगी अव्यय (Exclamatory word)
Shabdanchya Jati in Marathi
शब्दांच्या जाती (Shabdanchya Jati in Marathi) एकूण आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दांची कार्य विविध प्रकारची असतात त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत त्यालाच शब्दांच्या जाती असे म्हणतात
शब्दांच्या जातीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात विकारी शब्द त्याला सभ्य असे म्हणतात आणि अविकारी शब्द त्यालाच अव्यय असे म्हणतात
CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा नक्की काय आहे? जाणून घ्या | CAA act in Marathi
सुरुवातीला आपण विकारी शब्द म्हणजे काय ते पाहूयात – विकारी म्हणजे बदल घडणारी वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग बचत विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, यांचा समावेश होतो.
शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार जाणून घ्या
अविकारी शब्द त्यालाच आपण अव्यय असे म्हणतो वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्ती ने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय Shabdanchya Jati in Marathi यांचा समावेश होतो
- नाम – शब्दांच्या जातीमधील पहिला आहे नाम म्हणजे काय तर कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. नामामध्ये फुलांची फळांची पक्षांची प्राण्यांची नद्यांची पर्वतांची आणि वस्तूंची नावे येतात त्यांचा समावेश होतो त्याच बरोबर मुलांची मुलींची देशांची धान्याची काही काल्पनिक नावे गुणांची सुद्धा समावेश होतो
- सर्वनाम – नामाबद्दल येणारा शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरणे पहा मी, आम्ही, तो, ही, जे, आपण
- विशेषण – नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात
- क्रियापद – क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात याशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही
- क्रियाविशेषण अव्यय – क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात
- शब्दयोगी अव्यय – अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात
- उभयान्वयी अव्यय – दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात
- केवलप्रयोगी अव्यय – मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात मनातील भावना म्हणजेच दुःख वेदना यासारखे Shabdanchya Jati in Marathi