Captive Market Yojana :- नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका (AAY) धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत (free sadi) उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. कॅप्टिव मार्केट योजनेचा नवीन GR काढून या योजनेला मंजुरी दिली आहे या लेखात आपण या योजनेचे स्वरूप काय आहे लाभार्थी कोण राहतील लाभ कोणाला मिळणार आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
Captive Market Yojana 2024 Details:-
Plan | Captive Market Yojana |
Started | Maharashtra Gov |
Year | 2024 |
beneficiary | Antyodaya Ration Card (AAY) |
Apply Process | NA |
Update | 2024-2028 |
Captive Market Yojana :
शासन निर्णय दि.०२.०६.२०२३ अन्वये राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2024-28 ला मान्यता देण्यात आली आहे. यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल व दि.३१.०३.२०२८ पर्यंत वैध राहील असे नमूद केले आहे. सदर धोरणातील परिच्छेद क्र. ११(३) मध्ये \”कॅप्टिव्ह मार्केट- राज्यातील दारिद्रय रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत (free sadi yojana) उपलब्ध व्हावी यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह यथावकाश एक योजना तयार करेल.\” असे नमूद केले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. १७.०७.२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्रय रेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
Beneficiary of Captive Market Yojana :
योजनेचे स्वरुप:-
- योजनेचा कालावधी :-
सदर योजनेचा कालावधी सन 2023 ते 2028 या 5 वर्षासाठी निश्चित करण्यात येत आहे.
- लाभार्थी :-
- राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका AAY (पिवळे रेशन कार्ड धारक) धारक असलेल्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या २४.५८,७४७ इतकी आहे.
- दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ/ घट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्याच्या संख्येत वाढ/घट होणार आहे.
Captive Market Yojana Nodal Institution :
सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांना नोडल संस्था नेमण्यात येत आहे. महामंडळाने त्यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्था / सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (M.S.ME.) अंतर्गत नोंदणीकृत घटक यांच्याकडून निर्धारित केलेले तांत्रिक निकष विचारात घेवून साडीचे उत्पादन कार्यक्रम राबवावा.
GR DOWNLOAD - HERE