Online Varas Nond Maharashtra मध्ये करण्याची गरज तेव्हा येते जेव्हा कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे निधन होते. त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. पण तसे करण्याची आता आवश्यकता नाही. कारण भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र मध्ये एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच एक ते सात ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासन निर्णय (Online Varas Nond) करण्यात आला होता. याच निमित्ताने एक ऑगस्ट पासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर सर्वत्र ही सुविधा अमलात आणली आहे.
Online Varas Nond Maharashtra अर्ज कसा करावा
वर्षांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभुमी या वेबसाईटवर भेट देऊन लॉगिन करून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने असा अर्ज केल्यानंतर पुढे तो गावाच्या तलाठ्याकडेच ऑनलाईन पद्धतीने जाईल. पुढे तुमच्या अर्जाची तलाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व पडताळणी करून पाहतील. या पडताळणी मध्ये काही चूक आढळली किंवा कोणती कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला पुन्हा एकदा मेलद्वारे कळविण्यात येईल. असे असल्यास त्यामध्ये दुरुस्त करून तुम्ही पुन्हा अर्ज पाठवू शकता. आणि जर तुमची कागदपत्रे अगदी पूर्णपणे व्यवस्थित असतील तर तलाठ्यांकडून त्याची नोंद ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर करून घेण्यात येईल. ही एक महत्त्वाची सुविधा पण ऑनलाईन झाल्यामुळे आता नागरिकांना जलद गतीने व सोयीस्करपणेवारसांनी करता येईल.
भूमी अभिलेख विभाग
यापूर्वी वारसा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात जाऊन नागरिकांना रिचार्ज करून सर्व प्रोसेस ऑफलाईन करावे लागत होती. परंतु इतर ऑनलाईन केलेल्या सुविधांप्रमाणेच वारसा नोंदीची सुविधा देखील ऑनलाईन करण्यात येणार आहे. या इतर सुविधा म्हणजे डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार इत्यादी असे सुविधा ऑनलाइन मध्ये समाविष्ट आहेत. कोरोना नंतर ऑनलाईन सुविधा वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. या आधी नागरिकांना सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत असत परंतु त्यावर उपाय म्हणून डिजिटल सातबारा मिळवण्याची सुविधा करून देण्यात आली. याच धर्तीवर पुढचे पाऊल म्हणून वारसा नोंदणी देखील डिजिटल करण्यात आली आहे. भूमि अभिलेख विभाग नागरिकांना सोयीस्कर सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. Online Varas Nond Maharashtra
Online Varas Nond Maharashtra चे फायदे
नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे
ऑनलाइन असल्यामुळे प्रक्रिया जलद गतीने होईल
कार्यालयाला हेलपाटे मारण्याची गरज नाही
अर्जामधील दुरुस्त्या लवकर करता येतील
नागरिकांच्या सोयीनुसार कधीही ऑनलाइन अर्ज करू शकतील
इतर सुविधा
एक ऑगस्ट पासून वारसा नोंदणीचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या पुढील सुधारणा म्हणून कर्जाचा बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे इत्यादी सुविधांसाठी देखील ई हक्क प्रणाली मधून सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन चालू आहे.
WEBSITE – https://pdeigr.maharashtra.gov.in/
Conclusion
भूमी अभिलेख विभागाने Online Varas Nond त्यांच्या इतर सुविधांसोबत आता वारसा नोंदणी देखील ऑनलाईन केल्यामुळे नागरिकांचे कार्यालयाला होणारे हेलपाटे कमी होणार आहेत व सोईस्कर रित्या त्यांना वारसा नोंदणी करता येणार आहे. या पोस्ट मधून नक्कीच तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल. मी आशा करतो की तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारामध्ये प्रसारित कराल धन्यवाद !