Sheli Samuh Yojana Goat Cluster Scheme – राज्यामध्ये शेळी पालन व्यवसाय हा शेतमजूर, अल्प, अत्यल्प भूधारक, भटकंती करणारा समाज तसेच आदिवासी यांच्या उपजिवीकेचा एक प्रमुख व्यवसाय असून, राज्यामध्ये अंदाजे 48 लाख कुटुंबांना शेळी पालनामधून अर्थार्जन होत आहे.
हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षणप्रवण, दुष्काळी व निमदुष्काळी भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो. कोरडे हवामान शेळ्यांना पोषक असून दुष्काळी भागामध्ये जेथे अन्य कोणतीही पशुधन पाळण्यास मर्यादा येतात, तेथे शेळी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. \’Sheli Samuh Yojana\’
शेळी समूह योजना महाराष्ट्र
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेळी पालन व्यवसाय हे एक उत्पन्नाचे साधन आहे. अत्यंत कमी चाऱ्यावर व कठीण परिस्थितीतसुध्दा शेळ्या तग धरु शकतात.
बदलाशी त्वरीत जुळवून घेण्याची त्यांची क्षमता असते. अत्यंत कमी भांडवलात सुध्दा शेळी पालन व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार तरुण याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहत आहेत.
राज्यातील शेळ्यांच्या एकूण संख्येपैकी साधारणपणे 76% संख्या ही स्थानिक जातीच्या (नॉन- डिस्क्रीप्ट) शेळयांची आहे, त्यामुळे त्यांची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते.
तसेच शेळी पालन व्यवसायामध्ये पशुपालक असंघटीत असणे, शेळ्यांची दिशाहीन पैदास, पैदाशीकरिता जातीवंत नरांची कमतरता, शेळी पालकांचे व्यवसायातील सुधारित पध्दतीबाबतचे अज्ञान, शेळी पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असणे, वजनावर शेळ्यांची खरेदी विक्री न होणे Sheli Samuh Yojana
राज्यस्तरीय योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मौ. पोहरा, जि. अमरावती येथे \”शेळी समूह योजना (Goat Cluster scheme)\” ही नवीन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून राबविण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
Sheli Samuh Yojana Goat Cluster Scheme
योजनेचा उद्देश :-
- राज्यामध्ये समूह विकासामधून शेळीपालन व्यवसायास गती देणे.
- शेळी पालन संबधित नवीन उद्योजक निर्माण करणे.
- शेळी पालकांचे उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था स्थापन करून त्या माध्यमातून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, शेळी पालन व्यवसायाकरिता लागणाऱ्या सुविधा पुरविणे
- जसे – तांत्रिक माहिती, अद्याचवत तंत्रज्ञान, आरोग्यसुविधा, अनुवंशिक सुधारणा तसेच शेळ्यांकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जेणेकरून शेळी पालकांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे
- शेळी पालकांना त्यांच्याकडे उत्पादन होणाऱ्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे
- शेळीपालकांना फॉरवर्ड लिंकेजेस निर्माण करून देणे, जसे शेळयांच्या वजनावर विक्रीची व्यवस्था, दूध प्रक्रिया उद्योग निर्माण करणे, माल साठवणुकीकरिता शीतगृह, खाद्य कारखाने, निर्यात सुविधा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, कौशल्य विकास करणे, कृत्रिम रेतन, Breeding Improvement, लसीकरण इत्यादीची व्यवस्था करणे.
- शेळी पालनकरिता लागणाऱ्या वस्तू, साहित्य उपलब्ध करून देणे. Sheli Samuh Yojana
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करणे.
- ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार निर्मिती करणे.
- शेळयांच्या पैदास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.
शेळी पालकांसाठी शेळी समूह योजना
- नमूद मौजे पोहरा, जि. अमरावती येथे राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये नागपूर, वर्धा, व हिगोली या जिल्ह्यांचा तात्पुरत्या कालावधीसाठी समावेश करण्यात येत आहे.
- नागपूर व औरंगाबाद महसूल विभागासाठी ज्यावेळी स्वतंत्र्य प्रक्षेत्र कार्यान्वित होतील त्यावेळी पोहरा प्रक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातून नागपूर, वर्धा, व हिगोली जिल्हे वगळण्यात येतील आणि ते जिल्हे आपोआप त्या त्या महसूली विभागाच्या प्रक्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये सामाविष्ट होतील.
- वर मौजे पोहरा प्रक्षेत्राच्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील शेळी पालकांना फॉरवर्ड लिंकेजेस उपलब्ध करुन देण्याकरिता सदर योजने अंतर्गत शेळी समूह योजना
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा अमरावती यांच्या ताब्यात असलेली पशुसंवर्धन विभागाच्या नावे असलेल्या 9.5 एकर क्षेत्रावर सदर \”शेळी समूह योजना (Goat Cluster scheme)” स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- सदर क्षेत्रावर शेतकरी/पशुपालक/शेळीपालनाशी संबधित व्यावसायिक यांच्याकरिता विविध सुविधा निर्माण करण्यात येतील आणि त्यांच्या माध्यमातून प्रकल्प चालविण्यात येईल.
शेळी समूह योजनेचे स्वरूप
- शेळी पालकांना व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रोत्साहित करणे, उत्पादक कंपन्या स्थापन करणे (Backward Linkages)-
या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्यामधील किमान 30000 शेतकऱ्यांना/पशुपालकांना या व्यवसायाबाबत प्रोत्साहित करण्यात येईल. त्यासाठी या भागामध्ये सर्वेक्षण करून या व्यवसायामध्ये इच्छूक असणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येईल. त्यांना शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शेळी उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था यांच्या माध्यमातून शेळी समूह निर्माण करण्यात येईल. या समुहाच्या माध्यमातून शेळीपालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळ्या खरेदी करण्याकरीता मदत करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत समाविष्ट बाबी :-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा- अमरावती यांच्या ताब्यात असलेली व पशुसंवर्धन विभागाच्या नांवे असलेल्या 9.5 एकर क्षेत्रावर प्रामुख्याने खालील सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे:-
(१) सामूहिक सुविधा केंद्र (Common Facility Center) स्थापन करणे : सदर प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायासंबंधीत विषयाचे सखोल ज्ञान व्हावे, याकरिता State-of-the-art ही संकल्पना विचारात घेऊन शेळी समुह प्रकल्पांतर्गत 2 एकर क्षेत्रावर सामुहिक सुविधा केंद्र उभारण्यात यावे. त्यामध्ये प्रशिक्षण केंद्र (प्रशिक्षण वर्ग, विद्याशाखा खोली, बहुउद्देशिय हॉल), 100 प्रशिक्षणार्थी करिता निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान, इलेक्ट्रिसिटी, पाणी पुरवठा सुविधा, फर्निचर व इतर अनुषंगिक सुविधांची उभारणी करणे इ. बाबींचा समावेश असेल. \”शेळी समूह योजना\”
(२) शेळयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्र स्थापन करणे : सदर प्रकल्पांतर्गत सुमारे 2.5 एकर क्षेत्रावर शेळ्यांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे 2 युनिटस स्थापन करण्यात यावेत. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस/संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात यावी. ज्या व्यक्ती/संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती/संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.
(३) शेळयांचे मांस प्रक्रिया केंद्र स्थापन करणे : सदर प्रकल्पांतर्गत सुमारे 1.5 एकर क्षेत्रावर मांस प्रक्रिया केंद्र (१ युनिट) स्थापन करण्यात यावे. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस/ संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात यावी. ज्या व्यक्ती/ संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती/संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.
(४) शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांकरिता कार्यालय सदर प्रकल्पांतर्गत सुमारे 0.5 एकर क्षेत्रावर शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांसाठी कार्यालय उभारण्यात यावे. सदर कार्यालय शेळी उत्पादक कंपनी किंवा खाजगी व्यवसायीकांना भाडे करारावर देण्यात यावे. शेळी समूह योजना