मोफत कॉम्पुटर कोर्स, ऑनलाईन अर्ज ! : Sarthi free Computer Course 2024

By Dipali Pawar

Published on:

Sarthi Free Computer Course 2024 : नमस्कार मित्रांनो सारथी संस्था अंतर्गत मराठा असेल कुणबी मराठा असेल अशा विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे. सारथी संस्था तुमच्यासाठी मोफत कम्प्युटर कोर्स घेऊन येत आहे, यासाठी 40,000 जागा शिल्लक आहेत तर फॉर्म नक्की कोण भरू शकतो पात्रता काय आहे अप्लाय कसे करायचं सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarthi free Computer Course 2024

सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (Sarthi free Computer Course ) संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

CSMS-DEEP Course Details

🖥️ Program CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI Digital Employability Enhancement Program (“CSMS-DEEP) – Sarthi free Computer Course
Eligibility 10th pass
🛂 Age criteria 18 to 45 limit
💺 Total Seats 40,000 जागा
👨‍🏫 Course Duration 6 months

 

सारथी मोफत कॉम्पुटर कोर्स

उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निःशुल्क असून सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण खर्च सारथी, पुणे मार्फत करण्यात येईल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमार्फत (ALC) महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येईल.

सदर प्रशिक्षण हे अनिवासी (Non Residential) असून, प्रशिक्षणादरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्था उमेदवारास स्वःखचनि करावी लागेल.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉनक्रिमिलेयर गटाच्या वयोगट 18 ते 45 मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज (Sarthi free Computer Course ) भरण्याची सुविधा दिनांक 01/01/2024 पासून सुरु करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्रांसह स्वः खचनि उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी.

Free Computer Course 2024

प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून व प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर (www.mkcl.org/csmsdeep) योग्य वेळी प्रसिद्ध करण्यात येईल, अपूर्ण असलेले तसेच मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

  • मराठा उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर /EWS (Economically Weaker Section) असल्याचे प्रमाणपत्र
  • TC / LC व 1 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र

हे सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर, उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे घटक, कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील.

Sarthi free Computer Course Documents List Here

उमेदवाराने Sarthi free Computer Course ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड/जोडावयाची कागदपत्रे

  1. विहीत नमुन्यातील व फोटोसहित परिपूर्ण अर्ज
  2. प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (किमान दहावी पास)
  3. सक्षम अधिकान्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी SDO यांचे प्रमाणपत्र) किंवा TC/LC (शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला) आणि 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (March 31, 2024 पर्यंत वैध
  4. जन्म दाखला
  5. नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र / मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी/तहसीलदार यांचे प्रमाणपत्र) (March 31, 2024 पर्यंत वैध)
  6. तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  7. आधार कार्ड
  8. उमेदवाराचा फोटो व सही

Sarthi free Computer Course more information

प्रशिक्षण ठिकाण एमकेसीएल संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC)
अर्ज करण्यासाठी लिंक https://sarthi.mkcl.org/applicant/#/registration
Email ID csmsdeep@mkcl.org
संपर्क क्रमांक +91-8956537496
संस्थेचे संकेतस्थळ www.sarthi-maharashtragov.in
  www.mkcl.org

Conclusion

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही सारथी संस्था अंतर्गत Sarthi free Computer Course मराठा असेल कुणबी मराठा असेल अशा विद्यार्थ्यांना मोफत कॉम्पुटर कोर्सची सुवर्णसंधी आहे. याची माहिती दिली आहे, या सुवर्णसंधीची माहिती, कागदपत्रे कोणती आहेत, आणि इतर माहिती. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

सारथी मोफत कॉम्पुटर कोर्स प्रशिक्षण ठिकाण?

एमकेसीएल संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC)

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी कोठे प्रसिद्ध करण्यात येईल?

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.mkcl.org/csmsdeep येथे प्रसिद्ध करण्यात येईल.

सारथी मोफत कॉम्पुटर कोर्सची पात्रता?

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी .

फ्री कॉम्पुटर कोर्स अंतर्गत एकूण जागा आहेत किती ?

40,000 जागा