कामगारांना १० हजार रू मिळणार, सन्मान धन योजना | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

सन्मान धन योजना (Sanman Dhan Yojana Maharashtra) अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत कोण लाभ घेऊ शकत, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून या जीआर मधून आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत शासनेन आज मान्यता दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanman Dhan Yojana

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम, २००८ च्या कलम ११ मध्ये “वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या परंतु ६० वर्ष पूर्ण केलेली नसतील,” अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे. तरी, सद्यःस्थितीत शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक ८ ऑगस्ट २०१४, दि.०५.०१.२०२३ व दि.२५.०३.२०२३ अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरुपात सन्मान धन योजना, २०२२ राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जिवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन्मान धन योजना शासन निर्णय (GR)

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना Sanman Dhan Yojana महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये 10,000/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

  1. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. २. लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर लाभार्थी जिवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने खात्री करुन घेण्यात यावी.
  2. अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम १५ (३) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.
  3. सदर अर्थसहाय्याचे वाटप Sanman Dhan Yojana जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.
  4. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.
  5. वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांनी करावे.

GR DOWNLOAD – HERE

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.