नमस्कार मित्रांनो , आज आपण संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे संजय गांधी निराधार योजना आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य, कोण ह्या योजनेचे लाभार्थी असतील , काय लागणार आहे , कागदपत्रे , अर्ज कसा भरायचा , कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
काय आहे संजय गांधी निराधार योजना ?
Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra
आपलं महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये गरीब जनतेसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra म्हणजे महाराष्ट्र मध्ये निराधार पुरुष / महिला , अपंग , विधवा , घटस्फोट झालेल्या महिला , अनाथ , विविध मोठे आजार ने बाधित महिला पुरुष , परितक्त्या महिला , वेश्या व्यवसाय सोडलेल्या ज्या आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत अश्या इत्यादी . अश्या वरील पुरुष / महिला ज्यांना दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबुन राहावं लागणार नाही ह्या योजनेला संजय गांधी निराधार योजना म्हंटले जाते.
संजय गांधी योजनेचा उद्देश्य :
संजय गांधी निराधार ( Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra ) योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे
संजय गांधी योजना 2024 हि कोणाला लागू होईल ?
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कायद्याची पत्नी ह्या योजनेची लाभार्थी होऊ शकते.
- घटस्फोट प्रक्रियेतील किंवा घटस्फोट झालेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात अपवाद ज्यांना पोटगी मिळाली नाही अश्या महिला. Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra
- ३५ वर्षाखालील अविवाहित स्त्री
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
- अत्याचारित / पीडित महिला
- वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
- तृतीयपंथी
- देवदासी
- अपंग : अंध , मूकबधिर , कर्णबधिर , मतिमंद इत्यादी स्त्री – पुरुष
- क्षयरोग , कर्करोग , एड्स , कृष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा रोजगार चालवू न शकणारे पुरुष / स्त्री
- निराधार महिला , निराधार विधवा , निराधार परितक्त्या
- १८ वर्षाखालील अनाथ बालक
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्रता व अटी
१] अर्ज करणारा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा लाभार्थी व्यक्तीचे वय ६५ वर्षाखालील असणे आवश्यक आहे.
२] अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणतहि माध्यम नसाव.
३] ६५ वर्षावरील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
४] अर्ज करणारा किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
५] अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत असणे आवश्यक आहे.
६] मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तीला नोकरी मिळेपर्यंत (शासकीय / निमशासकीय / खाजगी) लाभ मिळेल. या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या (शासकीय / निमशासकीय / खाजगी) अविवाहीत मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करुन लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात येईल.
७] मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटूंबाला Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल
८] लाभार्थ्यांच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रु.२१,०००/- पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होईल.
९] अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतीमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रु.२१,०००/- पर्यंत असावे.
Read More – रोजगार हमी योजना महाराष्ट्र | Rojgar hami yojana mahrashtra
लाभार्थी ची वर्षातून एकदा खालील काही गोष्टींची तपासणी केली जाईल.
1. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे जेथे खाते आहे अशा बैंक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्तरकडे स्वत: हजर राहावे लागेल व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर / पोस्ट मास्तर करतील.
2. कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्याने नायब तहसिलदार तहसिलदार उप विभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी ) यांचे समोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसिलदाराकडे सादर करावे.
3. कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र (लाईव्ह सर्टीफिकेट) सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी १ एप्रिल पासून आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन देण्यात येणार नाही.
संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra )अनुदान योजने अंतर्गत समाविष्ट जाती :
- खुला वर्ग
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- इतर मागास वर्ग
- विशेष मागास वर्ग
- भटक्या जमाती
Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra फायदे खालील प्रमाणे :
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रतिमहिना १००० /- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते
एका कुटुंबात या योजनेचे एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास प्रति महिना १२००/- रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते
राज्यातील व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनतील
Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra लागणारे कागदपत्रे :
- अर्जदाराचा फोटो
- ओळखीचा पुरावा पारपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- निमशासकीय ओळखपत्र
पत्ता पुरावा :
ग्रामसेवक / तलाठी यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
वयाचा पुरावा :
- शाळा सोडल्याचा दाखला
- शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या वहीतील उताऱ्याची साक्षांकित यादी
रहिवासी दाखला :
ग्रामसेवक , तलाठी , मंडळ निरीक्षक किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
अपंगाचे प्रमाणपत्र :
- असमर्थेचा / रोगाचा दाखला
- कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी दाखला
- तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला
- महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला
अनाथ असल्याचा दाखला
ग्रामसेवक / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला प्रकल्प अधिकारी , एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला
संजय गांधी योजनेसाठी (Sanjay Gandhi niradhar yojana online apply) अर्ज करण्याची पद्धत :
- संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
- अर्ज करून झाल्यानंतर विचारलेल्या कागदपत्रांचे PDF अपलोड करून अर्ज सादर / सबमिट करायचा आहे.
- अर्ज करताना ३३ /- रुपयांचे payment करायचे आहे.
- payment झाल्यावर अर्ज ३० दिवसांसाठी मजुरीसाठी तहसील कार्यालय मध्ये जाईल.
- ३० दिवसानंतर सुद्धा अर्ज मंजूर झाला नाही तर तुमचे सर्व कागदपत्रे सहित तहसील कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे जमा करायची आहे , मग अर्ज मंजूर करायचा आहे.
Conclusion :
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi niradhar yojana maharashtra ) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय, कागदपत्रे कोणती लागतील , अर्ज करण्यासाठी पात्रता काय असेल , अर्ज कसा करावा इत्यादी मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल . धन्यवाद !!