नमस्कार मित्रांनो , आज आपण एक लाख रुपयाची बिनव्याजी शिष्यवृत्ती योजना , सकाळ मार्फत (Sakal Foundation Scholership 2024) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे एक लाख रुपयाची बिनव्याजी शिष्यवृत्ती योजना , सकाळ मार्फत आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य , काय लागणार आहे , कागदपत्रे , अर्ज कसा भरायचा , कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक संस्था, विद्यापीठे आणि स्वतंत्र संस्था विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी स्कॉलरशिप देतात. करिअर डेव्हलपमेंट स्कॉलरशिप म्हणजेच भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी शिष्यवृत्ती ही गरजू, गुणवंत आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळ्या निकषांनुसार दिली जाणारी आर्थिक मदत आहे.
सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे करिअर डेव्हलपमेंट स्कॉलरशिप
सकाळ इंडिया फाऊंडेशन 1959 पासून शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज आणि करिअर मेंटॉरिंगसह विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे. Sakal Foundation Scholership या संस्थेची स्थापना करण्याचा विचार कमकुवत आर्थिक पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना अनुदान आणि शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या कल्पनेतून पुढे जाण्यासाठी, SIF ने तीन दशकांपूर्वी त्यांची करिअर डेव्हलपमेंट स्कॉलरशिप सुरू केली. आतापर्यंत, SIF ने उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती दिली आहे.
सकाळ फाऊंडेशन बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती
१० वी पास विद्यार्थ्यांना महिना ३००० रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप Kotak Mahindra Scholership
Sakal Foundation बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती साठी अर्ज कोणी करावा?
परदेशी विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (2023-24) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले. भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.ला प्रवेश दिल्याबद्दलचे २०२१ किंवा त्या पूर्वीचे
विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र समजले जातील.
सकाळ फाऊंडेशन तर्फे बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती (Sakal Foundation Scholership) साठी नियम काय असतील ?
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षांत किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाची पदव्युत्तर किंवा पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये दहा हजार इतकी रक्कम न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.
Sakal Foundation Scholership अर्जाची मुदत – १५ मे ते २५ जून २०२३
- अधिक माहितीसाठी संपर्क करा :
- सकाळ इंडिया फाउंडेशन
- सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२
- संपर्क क्रमांक : ०२०-६६०३५९३५
- ई-मेल – contactus@sakalindiafoundation.org/sakal