RTE Admission 2024-25 age limit in Marathi – RTE (शिक्षणाचा अधिकार) प्रवेशासाठी वयोमर्यादा राज्य आणि संबंधित राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या विशिष्ट नियम आणि नियमांवर अवलंबून असते. साधारणपणे, RTE प्रवेश 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध आहे. तथापि, काही राज्यांमध्ये भिन्न वयोमर्यादा असू शकतात आणि 2024 शैक्षणिक वर्षासाठी RTE प्रवेशासंबंधी अचूक माहितीसाठी तुमच्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे चांगले.
RTE Admission 2024-25 age limit
विषय – सन 2024 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.
संदर्भ –
- शासन निर्णय क्रमांकः- आरटीई 2018 / प्र.क्र. 180 / एस.डी.-1, दिनांक 18/19/2020
- शासन निर्णय क्रमक:- आरटीई 2019 / प्र.क्र.119 / एस.डी.-1 दिनांक 25/07/2019.
उपरोक्त संदर्भ क्र. 1 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/09/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024 साठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 1023 अखेर पढील प्रमाणे राहील.
सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय
अ. क्र | प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय | दि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय |
1. | प्ले ग्रुप / नर्सरी | 1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2021 | 3 वर्ष | 4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
2. | ज्युनियर केजी | 1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2020 | 4 वर्ष | 5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
3. | सिनियर केजी | 1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 2019 | 5 वर्ष | 6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
4. | इयत्ता १ ली | 1 जुलै 2017 – 31 डिसेंबर 2018 | 6 वर्ष | 7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
My child age is 4.5 years,but we haven’t markshit of privious year.what can I do for it