राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना महाराष्ट्र | Rashtriya Gramin Peyjal Yojana Maharashtra

Rashtriya Gramin Peyjal Yojana Maharashtra: राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणातंर्गत अनेक पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त बाह्य अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्प, आपलं पाणी प्रकल्प यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजना, लघु नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहिरींवरील योजना यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठ्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना तसेच महाराष्ट्र भूजल अधिनियमांतर्गत भूजल संवर्धनाच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

या योजनेमुळे गावात पाण्याची टंचाई भासणार नाही व या योजनेद्वारे स्वच्छ पाणी मिळेल. या लेखामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची व्याप्ती, वर्गीकरण, अटी, कागदपत्रे, लाभ व संपर्क कुठे साधावा याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Rashtriya Gramin Peyjal Yojana

या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडविण्यात आलेले आहेत. तरीही, भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणी पुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे.

यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनामार्फत सन 2009-10 मध्ये वर्धीत वेग ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (National Rural Drinking Water Programme – NRDWP) असे करण्यात आले आहे.

Rashtriya Gramin Peyjal Yojana 2022 Maharashtra

भारत निर्माण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक १ एप्रिल, २००९ पासून राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत सम प्रमाणात ५०:५० टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत गावाचे, जिल्ह्याचे तसेच राज्याचे जलसुरक्षा आराखडे व वार्षिक कृती आराखडे तयार करणे बंधनकारक करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये भूजल व भूपृष्ठीय पाण्याचा संयुक्त व शाश्वत वापर, भूजल संवर्धन आणि पाण्याची गुणवत्ता या बाबींवर भर देण्यात आला आहे.

पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी व व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. Rashtriya Gramin Peyjal Yojana Maharashtra

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व्याप्ती

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राबविण्यात येत असलेला “मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP)” हा राज्यातील सर्व ग्रामीण भागास लागू राहील.

नव्याने निर्माण होत असलेल्या अथवा निर्माण झालेल्या नगरपंचायती/नगर पालिका / नागरी क्षेत्रासाठी हा कार्यक्रम लागू राहणार नाही. गावातील नागरिकांना व शहर लगतच्या नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने लाभ मिळेल.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना – थोडक्यात माहिती
उद्दिष्टे
 • राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
 • राज्यातील ग्रामीण भागात (गावे/वाड्या/वस्त्या) पाणी पुरवठा योजना राबविणे
व्याप्ती
 • राज्यातील सर्व ग्रामीण भागास लागू
 • नव्याने निर्माण होत असलेल्या अथवा निर्माण झालेल्या नगरपंचायती/नगरपालिका/नागरी क्षेत्रासाठी लागू नाही.
वर्गीकरण
 1. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना
 2. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
 3. प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना वर्गीकरण

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचे प्रामुख्याने खालील तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येत आहे.

 1. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना
 2. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
 3. प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे अशा प्रकारे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. ‘Rashtriya Gramin Peyjal Yojana in Marathi’

Rashtriya Gramin Peyjal Yojana अटी व कागदपत्रे

अटी:

 • 100 टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य.
  जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे.
 • गाव हगणदारीमुक्त होणे आदी.

आवश्यक कागदपत्रे :

प्रस्तावित योजनांसाठी आवश्यक त्या जमिनीचे संपादन, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे किंवा आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेणे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना लाभ व संपर्क

लाभ:-

 • गावातील सर्व नागरीकांना घरोघरी किमान 40 LPCD पाणी उपलब्ध करुन देणे.
 • शहरालगतच्या ग्रामपंचायती/वाड्या व वस्त्यांसाठी ७० LPCD
 • इतर ग्रामपंचायती/ वाड्या व वस्त्यांसाठी ४० LPCD

संपर्क कुठे साधावा:-

 • सर्व जिल्हा परिषद
 • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई Rashtriya Gramin Peyjal Yojana 2022 Maharashtra 

Leave a Comment

close button