pune convocation certificate online apply 2022 – पदवी प्रमाणपत्रासाठी करा अर्ज २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान अर्जास मुदत.
pune convocation certificate online apply 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 121 वा पदवी प्रदान समारंभ लवकरच घेण्यात येणार असून, यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या लिंकवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
अर्जाचा नमुना शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.
डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇
पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?
पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज ऑक्टोबर, नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत.
विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचा कालावधी कधीपर्यंत आहे?
विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 हा कालावधीत आहे.