Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2024 – पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत PM SVANIDHI योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोरोना काळात पथविक्रेत्यांना अर्थ सहाय्य म्हणून रु. 10,000 /- कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या योजनेला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याच योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून रकम आता रु. 20,000 /- आणि रु. 50,000/- ह्या आणखी पुढील कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना लाभाचा तपशील
- पथविक्रेले १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह रु. 10,000/- कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.
- पहिल्या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर नवे कर्ज हवे असल्यास त्या लाभार्थ्यांना दुसन्या टप्प्यात रु. 20,000 /- इतके नवे कर्ज उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नवा अर्ज करावा लागेल. त्या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर लाभार्थ्यांना पुन्हा नये कर्ज हवे असल्यास तिसन्या टप्प्यात रु. 50,000 इतके नवे कर्ज मिळू शकेल. त्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नवा अर्ज करावा लागेल.
- विहित कालावधीत कर्ज फेड केल्यास 7 % व्याज अनुदान मिळवण्यास
- डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधेस पात्र. \”Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2024\”
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची उद्दिष्टे
- पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून रकम आता रु.20,000/- आणि रु. 50,000/- ह्या आणखी पुढील कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे.
- नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.
- डिजिटल व्यवहारात प्रोत्साहन देणे. {Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2024}
५०,००० रू. कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Pradhan Mantri Svanidhi Yojana लाभार्थी पात्रता निकष
- दिनांक 24 मार्च 2020 वा त्यापूर्वीचे पथ विक्रेते.
- प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र असलेले पथ विक्रेते. (Category A)
- सर्वेक्षणांत जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे असे पथकविक्रेते. (Category C)
- आसपासच्या शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते. (Category D) [Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2024]
प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता कर्ज ऑनलाईन अर्ज पद्धत
- http//:pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही स्वतः अर्ज करू शकता.
- CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
- आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक.
- पथविक्रेता प्रमाणपत्र लागेल
- निवडणूक ओळखपत्र सुद्धा गरजेचे आहे.
lor kuth bhetan mi grampanchayt lavel la ahe