Police Patil Mandhan Vadh :- नमस्कार मित्रांनो, राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता भरघोस अशी पगार वाढ करण्यात आली आहे. किती वाढ झाली आहे. अगोदर किती पगार होता? याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. ही पोस्ट शेवटपर्यंत पाहा. आपल्या मित्रांना ही महत्वपूर्ण माहिती शेअर करा.
Police Patil Mandhan Vadh
पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनचा गावपातळीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. शासन निर्णय क्रमांक: बीव्हीपी-0818/प्र.क्र.95/पोल-8, दि.08-03-2029 अन्वये पोलीस पाटील यांना दरमहा रु.6,500/- इतके मानधन देण्यात येत आहे.
पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालांच्या मानधन वाढीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-2016/प्र.क्र.581/ई-10, दि.18-03-2017 अन्वये अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा रु.15,000/- इतके मानधन देण्याची शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावास दि.10-03-2024 रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव पगार वाढ | police patil salary maharashtra
शासन निर्णय
- राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा ( police patil salary maharashtra) देण्यात येणारे मानधन रु.6,500/- वरून रु.15,000/- (अक्षरी रूपये पंधरा हजार फक्त) इतके वाढविण्यात येत आहे.
- सदर मानधनवाढ दि.01-04-2024 पासून लागू होईल.
- यासंदर्भात होणारा खर्च 2055, पोलीस 110 ग्राम पोलीस, (00) (01) पोलीस व मेवास पाटील (20550221), 50 इतर खर्च या लेखाशिर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
Conclusion
मित्रांनो , police patil mandhan vadh ह्या पोस्ट मध्ये आम्ही पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव पगार वाढ police patil salary maharashtra या विषयी माहिती दिली आहे, जसे की पोलीस पाटलांना याअगोदर किती पगार होता आणि आता किती रुपयांनी वाढला आहे, शासन निर्णय काय झाला आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे. तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.
धन्यवाद !