परंपरागत कृषि विकास योजना 2022 | PKVY Scheme in Marathi

By Shubham Pawar

Published on:

PKVY Scheme in Marathi: राज्य शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) ही योजना २०१५-१६ पासून केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के या प्रमाणात‌ राबविण्याचा निर्णय संदर्भाधिन क्रमांक ०२ येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. यामध्ये सध्या ९३२ गटांचा तीन वर्षाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नवी दिल्ली येथे दिनांक ११ मे, २०१७ रोजी परंपरागत कृषी विकास योजनेची तिसरी कार्यकारी समितीची बैठक झाली. सदर बैठकीमध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याकरिता नवीन ३२६ गट मंजूर केलेले आहेत. त्यानुषंगाने राज्य शासनाने अनु.क्र.६ व ७ येथील शासन निर्णयान्वये ३२६ गटांचा प्रथम वर्षाचा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

तसेच ३२६ गटांसाठी केंद्र शासनाने व्दितीय वर्षाच्या कार्यक्रमासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सदर कार्यक्रम सन २०१९-२० मध्ये राबविण्यासाठी राज्य शासनाने अनु.क्र. १३ येथील शासन निर्णयान्वये ३२६ गटांचा व्दितीय वर्षाचा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. PKVY Scheme in Marathi

 

कृषी विकास योजना निधी

दिनांक १८.०९.२०१७ रोजीच्या तीन पत्रान्वये नवीन ३२६ गटांचा प्रथम वर्षाचा कार्यक्रम राबविण्याकरिता सन २०१७-१८ साठी केंद्र हिस्सा रू. १३९६.२१ लाख व राज्य हिस्सा रू.९३०.८० लाख असा एकूण रू.२३२७.०१ लाख इतका रकमेचा नियतव्यय मंजूर केलेला होता.

आता, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषि विकास योजना राबविण्याकरिता ३२६ गटांकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा रु.१२६.२४४४८ लाख इतक्या निधीस केंद्र शासनाचे मान्यता दिलेली आहे. PKVY Scheme in Marathi

केंद्र हिश्यास अनुसरुन राज्य हिस्सा रु. ८४.१६२९९ लाख असे एकूण रु. २१०.४०७४७ लाख होत असून त्यासाठी आवश्यक असलेली अर्थसंकल्पिय तरतूद सन २०१९-२० मध्ये उपलब्ध आहे. सदर निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ‘Paramparagat Krishi Vikas Yojana Maharashtra’

 

योजनेच्या प्रमुख अटी:

 1. 50 एकर क्षेत्राचा 50 शेतकऱ्यांचा एक गट तयार करणे.
 2. गटामध्ये भाग घेणा-या शेतकऱ्याने तीन वर्षे सेंद्रीय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक.
 3. एक शेतकऱ्यास 1 एकर व जास्तीत जास्त 2.5 एकर पर्यत लाभ घेता येतो.
 4. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी लिहून देणे बंधनकारक.
 5. यापूर्वी सेंद्रीय शेती कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
 6. एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य. त्यात महिला बचतगट, शेती महिला मंडळ, यांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे इतर 50 एकराचे गट करताना त्यामध्ये 16 % अनुसुचित जाती व 8% अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांची निवड करावी.
 7. गटात समाविष्ट होणा-या शेतकऱ्याकडे किमान दोन जनावरे असावेत.
 8. शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक. PKVY Scheme in Marathi
 9. कोरडवाहू व बागायती क्षेत्राचा स्वतंत्र गट करावे. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्राला प्राधान्य दिले जावे.
 10. प्रत्येक लाभार्थीने दरवर्षी माती, पाणी‌ तपासून घेणे बंधनकारक.
 11. अपारंपारिक उर्जास्त्रोताचा वापर करणा-या लाभार्थीस प्राधान्य.
 12. एक गट / समूह शक्यतो भौगोलिक व दळणवळणच्या दृष्टीने सोयीचे असलेल्या क्षेत्रातील असावा.
 13. आदिवासी व डोंगराळ क्षेत्रात / राज्यामध्ये प्रादेशिक परिषदेच्या मदतीने गट तयार करणे.

 

योजनेसाठी कागदपत्रे, लाभ PKVY Scheme in Marathi

आवश्यक कागदपत्रे:-

 • जमिनीचा 7/12 उतारा
 • बँक पासबुकची प्रत
 • रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र
 • जातीचा दाखला

(नोट:- सामान्यपणे इत्यादी प्रकारचे आवश्यक कागदपत्रे लागतात)

योजनेचा लाभ:-

शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, शेतकऱ्याने स्वत: सेंद्रीय निविष्ठा तयार करणे, सेंद्रीय निविष्ठा पुरवठा, सेंद्रीय उत्पादीत माल वाहतूक भाडे, अवजारे भाडयाने घेणे, सेंद्रीय शेती उत्पादीत मालाचे प्रमाणिकरण करणे आदी स्वरुपात शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.

लाभाचे स्वरूप म्हणजेच निधी आपल्याला वरी दाखवलेला आहे आपण तो वाचलेला आहे. तर कृषि विकास योजनेतून अशा प्रकारचे लाभ स्वरूप दाखविलेले आहेत. PKVY Scheme in Marathi

 

योजनेसाठी अनुदान मर्यादा, संपर्क PKVY Scheme in Marathi

या योजनेतून पीजीएस प्रणाली पध्दतीने सेंद्रीय शेती करुन तिचे प्रमाणीकरण करून सेंद्रीय शेतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकास विषमुक्त सेंद्रीय शेती उत्पादने उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व जमिनीचा पोत सुधारणे आदींसाठी ही योजना राबविली जाते.

50 शेतकरी 50 एकर क्षेत्राचे एका गटासाठी प्रथम वर्ष 7.067 लाख रुपये, व्दितीय वर्ष 4.98 लाख रुपये आणि तृतीय वर्ष 2.89 लाख रुपयांप्रमाणे देय राहील. अशा प्रकारे या योजनेची अनुदान मर्यादा आहे

या ठिकाणी संपर्क साधावा:- जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय (सर्व) PKVY Scheme Maharashtra 2022

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!