Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana :- विहीर पुनर्भरण या घटकाचा १०० टक्के (जास्तीत जास्त १४०५५ रुपये) अनुदानावर लाभ घेण्याकरीता https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलनाईन पध्दतीने नोंदणी करावी.त्याकरीता खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.
१. अर्जदाराचा ७/१२ व ८ अ चा उतारा कमाल जमिन धारणा ५ हे पर्यंत असावी,
२. जातीचा पुरावा (अनु जाती/अनु जमाती करीता).
३.विधवा परीतक्त्या असलयास त्याचे प्रमाणपत्र
४. आधार कार्ड.
शेती करीता पाणी हा अत्यंत आवश्यक घटक आहे. विहिरींव्दारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात भूजल पातळी खालावत आहे.वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे त्या करीता विहीर पुणर्भरण अत्यंत महत्वाचे आहे.पावसाचे वाहुन जाणारे पाणी विहिरीत सोडणे म्हणजे विहीर पुणर्भरण होय.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana
ओढया नाल्याचे पाणी थेट विहिरीत सोडल्यामुळे पाण्यासोबतच वाहत येणाऱ्या गाळामुळे विहीर बुजने किंवा पाण्याचे झरे बंद पडण्याचा धोका असतो म्हणून गाळविरहीत पाणी विहीरीत सोडणे अत्यंत महत्वाचे आहे.गाळविरहीत पाणी विहीरीत सोडण्यासाठी खालील विहीर पुणर्भरण पध्दतीचा आमलात आणावी. विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया
• विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये ३ मीटर वर मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खट्टे घ्यावेत.
• पहिला खडा ३ मीटर लांब, ३ मीटर रुंद व १ मीटर खोल घ्यावा.
• दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून ३ मीटर अंतरावर घ्यावा,
• दुसरा खड्डा २ मीटर लांब १५ मीटर रुंद व २ मीटर खोल घ्यावा
• पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिट घेऊन हा खड्डा ६ इंची पीव्हीसी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा.
• पहिला खड्डा दगडगोट्यांनी भरावा,
• दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी ०.४५ मीटर जाडीचा खडीचा धर भरावा. त्या घरावर ०४५ मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा. त्यानंतर ०४५ मीटर जाडीचा बारीक वाळूचा थर भरून त्यावर ०१५मीटर जाडीचा कोळशाचा थर भरून ध्यावा हा बहा तळापासून ४ इंची पीव्हीसी पाइपद्वारे विहिरीशी जोडावा.
• ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी ३ मीटर लाब, ३ मीटर रुंद व र मीटर खोल खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारे दोन मीटर लांब, १५ मीटर रुंद व २ मीटर खोल खड्ड्यात जाईल
• दुसऱ्या बदल्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल. विहीर पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी
• ओम्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.
• विहिरीत पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे.
• पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड़े असावेत. पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.
• ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये
• बाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
पात्र लाभार्थी व निवडीचे निकष
प्रकल्पांतर्गत गावातील शेतकरी गट, महिला बचत गट, भूमिहिन व्यक्तिंचे गट व जिल्हांतर्गत सर्व शेतकरी उत्पादक कंपनी.
आवश्यक कागदपत्रे
१. अर्जदार संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची, शेअर धारकांची यादी, सविस्तर प्रकल्प अहवाल, संस्थेची/गटाची नियमावली, प्रस्तावित इमारतीची ब्लूप्रिंट व बांधकाम अंदाजपत्रक, बँक खात्याचा तपशिल, प्रस्तावित जागेचा ७/१२, ८अ, नोंदणीकृत भाडेपट्टा, मशिनरी व अवजारे यांचे दरपत्रक.
२ . कारखाना व यंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम खर्चाच्या ६०% अनुदान देय राहील.
३. २०.०० लक्ष पेक्षा जास्त रक्कमेच्या प्रकल्पास नोंदणीकृतबँक /वित्तीय संस्था यांचे कडुन ७५% कर्ज मंजुर होणे आवश्यक आहे.
घटक:
१. भाडेतत्त्वावरील कृषि अवजारे केंद्र.
२.छोटे गोदाम व वेअर हाऊस.
३. स्वच्छता व प्रतवारी युनिट
४.फळ पिकवणी युनिट
५.पशु खाद्य निर्मिती उद्योग.
६.हळद, मिरची मसाले उद्योग,
७.ऑईलमिल युनिट.
८.डाळ मिल युनिट.
९. शित गृह युनिट.
१०. बिजप्रक्रिया युनिट.
११. मुरघास निमिर्ती युनिट.
१२. वातानुकूलित विक्री केंद्र.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana
वरील प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी/गटाच्या क्षेत्रातील वाव विचारात घेऊन स्वतः व्यवसाय निवडची मूभा आहे. शेतमाल एकत्रीकरण, प्रक्रिया, मुल्यवृध्दि, पणन व्यवस्था हा प्रस्तावित प्रकल्पांचा गाभा असावा. नविन प्रकल्प तसेच गरजेनुसार जुन्या प्रकल्पांचे आधुनिककीरण, विस्तारिकीकरण यामध्ये सामाविष्ट करता येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ: dbt.mahapocra.gov.in अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, समूह सहाय्यक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.