Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana:- गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana 2024
नियम व अटी
१.सदर योजना अव्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्याध्यांसाठी लागू केलेली असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान 70 टक्के गुण संपादित केलेले असावेत.
३. पात्र विद्यार्थ्याचे वय पदवी अभ्यासक्रमाकरिता 23 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता025 पेक्षा जास्त नसावे.
४. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील, विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील.
५. महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
६. विद्यार्थ्यांने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
७. विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
८. विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
९. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
१०. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
११. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यानी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील
Apply Here – https://bcud.unipune.ac.in/Scholorships
My obtaining coins plz